गोवळकोट रोडवरील खाद्यपदार्थांची खवय्यांना भुरळ

गोवळकोट रोडवरील खाद्यपदार्थांची खवय्यांना भुरळ

१३ (टूडे ३ साठी, अँकर)

rat४p२०.jpg ः
२४M७५२१९
चिपळूण - रमजानच्या निमित्ताने गोवळकोट रोडवर तयार होणाऱ्या विविध खाद्यपदार्थांना मागणी असते.
--------------

गोवळकोट रोडवरील खाद्यपदार्थांची खवय्यांना भुरळ

रमजानचे वेगळेपण; जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थ, सर्वधर्मियांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ : रमजान आणि गोवळकोट मार्गावरील विविध प्रकारचे पदार्थ आणि त्याच्या वेगळेपणाची भुरळ केवळ चिपळूण शहरच नव्हे तर आजुबाजूच्या असंख्य खवय्यांना पडते. यंदाही गोवळकोट रोडवर असंख्य प्रकारच्या पदार्थांमुळे चंगळ झाली असून, येथील परिसर खवय्यांच्या उपस्थितीमुळे बहरला आहे.
मुस्लिम धर्मातील नागरिक रोजा इफ्तारसाठी घरी विविध पदार्थ बनवतात; मात्र सध्या विकत पदार्थ आणण्यावर भर दिला जातो. त्यामुळे इफ्तारीसाठी लागणारे सर्व पदार्थ गोवळकोट रोडवर विकत मिळतात. इफ्तारनंतर अनेकजण रात्रीचे जेवण न करता गोवळकोट रोडवर मिळणारे पदार्थ खात असतात. त्यामुळे रमजान महिन्याच्या निमित्ताने गोवळकोट रोड परिसरात रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणात तरुणाई, आबालवृद्धांनी आपल्या आवडीचे असंख्य पदार्थ खाण्यासाठी गर्दी करत आहेत. येथे चांगले पदार्थ खाण्यासाठी मिळतात म्हणून केवळ मुस्लिम नव्हे तर इतर समाजातील लोकही सायंकाळी ६ नंतर गोवळकोट रोडवर गर्दी करतात. शिमगोत्सवानिमित्त मुंबई-पुण्यातील चाकरमानी चिपळुणात आले आहेत. ते सायंकाळी आपल्या नातेवाईकांना घेऊन गोवळकोट रोडवर येतात. त्यामुळे सर्वधर्मातील नागरिकांची तिथे गर्दी होते. गोवळकोट रोडवरील व्यापारी व किरकोळ विक्रेते या पवित्र महिन्याची वाट पाहत असतात. या काळात येथे दररोज शेकडोंच्या संख्येने लोक येतात तसेच या महिन्यात लाखो रुपयांची उलाढाल होते. मागील २५ वर्षाहून अधिक काळ हा वारसा गोवळकोट रोडने जपला आहे.

…..

या पदार्थांना सर्वधिक पसंती

रमजाननिमित्त येथे चिकन सामोसे, चिकनरोल, शिक-कबाब, शाहीतंदुरी, चिकन तंदुरी, लसूनी टिक्का, देशमी टिक्का, पहाडीटिक्का, लॉलीपॉप, रूमाली रोटी, पाया सूप, चिकनरोल, मटणरोल, चिकनकोरमा, छोटे कबाब आणि हैदराबादी, लखनवी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी लोक येतात तसेच मसालामिल्क, मटका रबडी, केशर बदामी मिल्क यांनाही मोठी मागणी असते त्याशिवाय पाणीपुरी, भेलपुरीचे वेगवेगळे पदार्थ येथे विकले जातात.
----------
कोट

मुंबईसह परदेशात काम करणारे अनेक तरुण गावी आले आहेत. त्यांनी गोवळकोट रोडवर गाळे घेऊन छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले आहेत. रमजान महिन्यात येथील खाद्यपदार्थांच्या दुकानात मोठी गर्दी असते. गोवळकोट रोडवर पालिकने सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याने शहरातील दुसरी बाजारपेठ तयार होईल.

- जफर कटमाले, गोवळकोट चिपळूण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com