समर्थ भंडारी पतसंस्थेला ५ कोटी २६ लाख नफा

समर्थ भंडारी पतसंस्थेला ५ कोटी २६ लाख नफा

१७ (टूडे ३ साठी)


rat४p२१.jpg -
२४M७५२२०
प्रभाकर आरेकर

समर्थ भंडारी पतसंस्थेला ५ कोटींचा नफा

प्रभाकर आरेकर ; १७ शाखा, २ संकलन केंद्र
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ ः येथील श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेला २०२३-२४ या वर्षात १३ कोटी ३६ लाखाचा ढोबळ नफा झाला तर आवश्यक त्या सर्व तरतुदी केल्यानंतर संस्थेला ५ कोटी २६ लाख निव्वळ नफा झाला आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांनी दिली.
संपूर्ण कोकण विभाग कार्यक्षेत्र असलेल्या पतसंस्थेच्या १७ शाखा व २ संकलन केंद्र कार्यरत आहेत. संस्थेने नियोजनबद्ध कामकाजाबरोबरच विश्वासार्हता, पारदर्शकता, व्यावसयिकता तसेच सुरक्षितता यांना प्राधान्य दिले. ३१ मार्च अखेर संस्थेच्या एकूण ठेवी १८३ कोटी २१ लाख झाल्या असून, मागील वर्षापेक्षा ठेवींमध्ये २९ कोटी ८० लाखांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे संस्थेचा एकूण कर्जव्यवहार १४५ कोटी ६३ लाख असून, कर्जव्यवहारामध्ये २२ कोटी ६९ लाख वाढ झाली आहे. संस्थेचे भागभांडवल ९ कोटी ८१ लाख, निधी १२ कोटी ४९ लाख, गुंतवणूक ७२ कोटी ३८ लाख तसेच संस्थेचे खेळते भांडवल २३३ कोटी २८ लाख झाले आहे.
संस्थेचा एकत्रित व्यवसाय ३२८ कोटी ८४ लाख झालेला आहे. संस्थेने सभासद, ठेवीदार व ग्राहक यांना चांगल्याप्रकारे सेवा देण्याचा प्रयत्न केला असून, संस्थेला सर्वांकडून नेहमीच प्रतिसाद मिळालेला आहे. संस्थेने केलेल्या सुरक्षित कर्ज वितरण व नियोजनबद्ध वसुली यामुळे संस्थेच्या थकबाकीचे एकूण कर्जाशी प्रमाण केवळ ०.१२ टक्के इतके आहे. संस्थेने ३१ मार्चअखेर एनपीओचे प्रमाण शून्य टक्के राखलेले आहे. संस्थेमध्ये सीबीएस प्रणालीद्वारे ग्राहकांना सेवा देण्यात येत असून, संस्थेच्या सर्व शाखांमध्ये बँकिंगच्या बहुतांश सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. संस्थेच्या या प्रगतीमध्ये संस्थेचे संचालक मंडळ, कर्मचारीवर्ग तसेच सभासद, ठेवीदार, ग्राहक तसेच हितचिंतक यांचे महत्वाचे योगदान व सहकार्य असल्याचे संस्थापक, अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com