लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान झाले १९९९ ला

लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान झाले १९९९ ला

१४ (निवडणूक पानासाठी, अँकर)

रत्नागिरी लोकसभेसाठी १९९९ ला सर्वाधिक मतदान

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : रत्नागिरी लोकसभा मतदार संघातील गेल्या १७ निवडणुकांमध्ये सर्वाधिक मतदान १९९९ ला झाले होते. रत्नागिरी लोकसभा मतदार संघात ६६.९९ टक्के झाले आणि यातून शिवसेनेचे अनंत गीते विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुजित झिमण यांचा पराभव केला होता. राजापूर मतदार संघ असताना १९७७ ला सर्वाधिक मतदान ६३.३४ टक्के झाले होते. यात प्रा. मधू दंडवते यांनी काँग्रेसच्या गोपाळ मयेकर यांचा पराभव केला होता.
लोकसभेच्या स्थापनेनंतर पहिल्या सार्वत्रिक निवडणुका १९५२ ला झाल्या. त्या वेळी उत्तर रत्नागिरीतून काँग्रेसचे जगन्नाथराव भोसले विजयी झाले. दक्षिण रत्नागिरीतून मोरेश्वर जोशी विजयी आले. १९६७ ला झालेल्या चौथ्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी मतदार संघात ४७ टक्क्यांवरून ६१.१४ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत रत्नागिरीतून काँग्रेसच्या शारदा मुखर्जी विजयी झाल्या. राजापूर मतदार संघातही ४७ वरून ५९.५६ टक्के मतदान झाले आणि या संघातून प्रजा समाजवादी पक्षाचे बॅ. नाथ पै हे निवडून आले. रत्नागिरी जिल्हा एकसंध होता तेव्हा मंडणगड ते रत्नागिरी हा उत्तर विभाग तर राजापूरपासून आताचा सिंधुदुर्ग जिल्हा हा दक्षिण विभागात होता. १९५७ ते २००९ पर्यंत उत्तर रत्नागिरीऐवजी रत्नागिरी मतदार संघ आणि दक्षिण रत्नागिरीचे राजापूर मतदार संघ असे नाव बदलण्यात आले. २०२४च्या निवडणुकीत मतदानाची आकडेवारी वाढते का, हे पाहणे रंजक ठरेल.
--------
*वर्ष* मतदार संघ* टक्केवारी
*१९५२* रत्नागिरी उत्तर* ३८.४९
* -,,-* रत्नागिरी दक्षिण* ३८.७०
*१९५७* रत्नागिरी* ४५.१६
*-,,-* राजापूर* ४५.६४
*१९६२* रत्नागिरी* ४६.९६
*-,,-* राजापूर* ४७.५०
*१९६७* रत्नागिरी* ६१.१४
*-,,-* राजापूर* ५९.५६
*१९७१* रत्नागिरी* ५९.९२
*-,,-* राजापूर* ५६.४९
*१९७७* रत्नागिरी* ६१.६८
*-,,-* राजापूर* ६३.३४
*१९८०* रत्नागिरी* ६३.५०
*-,,-* राजापूर* ५८.२३
*१९८४* रत्नागिरी* ६४.४३
*-,,-* राजापूर* ६३.५४
*१९८९* रत्नागिरी* ६६.२०
*-,,-* राजापूर* ६३.२९
*१९९१* रत्नागिरी* ५१.९३
*-,,-* राजापूर* ४८.८८
*१९९६* रत्नागिरी* ५७.६८
*-,,-* राजापूर* ५५.३६
*१९९८* रत्नागिरी* ५७.७९
*-,,-* राजापूर* ५५.१०
*१९९९* रत्नागिरी* ६६.९९
*-,,-* राजापूर* ५७.७१
*२००४* रत्नागिरी* ६१.३६
*-,,-* राजापूर* ५७.५१
*२००९* रत्नागिरी-सिंधुदुर्ग* ५७.३९
*२०१४* रत्नागिरी-सिंधुदुर्ग* ६५.८५
*२०१९* रत्नागिरी-सिंधुदुर्ग* ६१.९९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com