खेड तहसीलमध्ये अग्निशमनची व्यवस्थाच नाही

खेड तहसीलमध्ये अग्निशमनची व्यवस्थाच नाही

५ (टुडे पान १ साठी)


-rat४p२७.jpg-
२४M७५२४५
खेड ः तहसील कार्यालयाची इमारत.
----------

खेड तहसीलमध्ये अग्निशमन व्यवस्था नाही

नागरिकांच्या सुरतक्षिततेचा प्रश्न ; आपत्कालीन परिस्थितीचा विचार नाही

सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ४ : खेड शहरामध्ये तहसीलदार कचेरीच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा तळमजला व पहिला मजल्याचे बांधकाम पाच वर्षांपूर्वी पूर्ण झाले. त्यानंतर या इमारतीमध्ये तहसील कार्यालयाचे कामकाज सुरू झाले असले तरी अग्निशमनाची कोणतीही व्यवस्था अथवा साहित्य या कार्यालयामध्ये आढळून येत नाही. ही अतिशय गंभीर बाब असून, तहसील कार्यालयामध्ये काम करणारे कर्मचारी, दररोज विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करण्यात आलेला नाही.
खेड तहसील कार्यालयाचे कामकाज २०१९ मध्ये शहरातील जुन्या इमारतीच्या जागेत उभारण्यात आले. या नवीन मध्यवर्ती शासकीय इमारतीमध्ये कामकाज सुरू होत असताना संबंधित ठेकेदाराने काही त्रुटी ठेवल्या. परिणामी, येथे कामासाठी येणारे अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांच्या जीविताशी खेळ सुरू आहे. खेड तहसील कार्यालयाला कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाहेर पडता येईल, अशी व्यवस्थाच करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवेशासाठी व बाहेर पडण्यासाठी आणि आगीसारखा कोणताही प्रसंग उद्भवल्यास त्याच्यावर प्राथमिक उपाययोजना तातडीने करता येईल यासाठी अग्निशमनचे कोणतेही साहित्य या इमारतीच्या तळमजल्यावर अथवा पहिल्या मजल्यावर दिसून येत नाही.
पाच वर्षे उलटूनदेखील त्या ठिकाणी यंत्रणा बसवण्यात आलेली नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर कामाच्या निवेदनामध्ये अग्निशमन यंत्रणा किंवा उद्वाहन यंत्रणा बसवण्यासाठी निधीची कोणतीही तरतूद नाही, अशी माहिती तहसीलदार सोनावणे यांनी दिली. ही बाब गंभीर असून, शासनाचे महत्वाचे दस्तावेज असलेल्या तहसील कार्यालयामध्ये अग्निशमन यंत्रणा नसणे, ही बाब गंभीर आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन संबंधित विभागाला युद्धपातळीवर ही यंत्रणा बसवण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
-------
कोट
तहसील कार्यालयात याबाबत कोणतीही व्यवस्था नाही. आम्ही आमच्या वरिष्ठांकडे याबाबत आजच पत्रव्यवहार करू.
--सुधीर सोनावणे, तहसीलदार, खेड
------
चौकट
एकच जीना, पर्यायी व्यवस्था नाही

या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर येण्यासाठी एक जीना असून, अन्य कोणतीही दुसरी व्यवस्था या ठिकाणी चढ-उतार करण्यासाठी नाही. पहिल्या मजल्यावर प्रशासनाची तीन वेगवेगळी कार्यालये असून, त्या ठिकाणी देखील अग्निशमनची कोणतीही व्यवस्था नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com