शासकिय गोडाऊन बनले तळीरामांचा अड्डा

शासकिय गोडाऊन बनले तळीरामांचा अड्डा

swt48.jpg व swt49.jpg
75261, 75262
मालवणः शहरातील कुंभारमाठ जरीमरीवाडी येथील शासकीय धान्य गोडाऊन इमारत वापराविना पडून आहे. दुसऱ्या छायाचित्रात परिसरात दारुच्या बाटल्यांचा खच पडला आहे. (छायाचित्रेः प्रशांत हिंदळेकर)

शासकिय गोडाऊन बनले
तळीरामांचा अड्डा
मालवण-कुंभारमाठमधील प्रकारः कोट्यावधी खर्चूनही वापराविना पडून
प्रशांत हिंदळेकर : सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ४ः शहरातील कुंभारमाठ जरीमरीवाडी येथे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले शासकीय धान्य गोडाऊन सध्या तळीरामांचा अड्डा बनला आहे. महसूल प्रशासनाकडून सातत्याने मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने उर्वरित कामासाठी अंदाजपत्रकच न दिल्याने आणि त्यामुळे शासनाकडून अनुदान न मिळाल्याने सध्या हे गोडाऊन वापराविना पडून आहे.
शहराच्या लगतच असलेल्या कुंभारमाठ जरीमरीवाडी येथे हुतात्मा स्मारकाच्या समोरच असलेल्या शासकीय जागेत धान्य ठेवण्यासाठी तीन वर्षांपूर्वी भव्य असे गोडाऊन बांधले आहे. मात्र, वॉचमन, स्वच्छतागृह, निवासाची व्यवस्था, दगडी कंपाउंड, गोडाऊनच्या परिसरात धान्याच्या गाड्या उभ्या करण्यासाठी भर टाकणे यांसारखी अनेक कामे गेली दोन वर्षे प्रलंबित आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेले हे गोडाऊन सध्या वापराविना पडून असल्याचे दिसून येत आहे.
कुंभारमाठ जरीमरीवाडी येथील हुतात्मा स्मारक व हे शासकीय गोडाऊन सध्या दारू अड्डा बनल्याचे दिसून येत आहे. दारू, बियरच्या बाटल्यांचा खच या भागात टाकण्यात आला आहे. त्याचबरोबर जेवणावळीच्या प्लास्टिक प्लेट, अन्य प्रकारचा कचरा या परिसरात टाकला आहे. यात कहर म्हणजे दारुड्यांनी या गोडाऊनच्या खिडक्यांच्या काचाही काढून नेल्या आहेत. याभागात गैरप्रकारही सुरू असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष पुरवून संबंधितांवर कारवाई करत अशा प्रकारांना आळा घालणे गरजेचे बनले आहे.
शासकीय धान्य ठेवण्यासाठी कुंभारमाठ जरीमरीवाडी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गोडाऊन बांधले आहे. या गोडाऊनमध्ये शासकीय धान्य ठेवले जाणार असल्याने त्यादृष्टीने अन्य अत्यावश्यक कामे मार्गी लागणे आवश्यक आहेत. यासाठी महसूल विभागाने गेली दोन वर्षे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे उर्वरित कामे मार्गी लावण्यासाठी अंदाजपत्रक बनवून देण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्यापपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने याची कार्यवाही केलेली नाही. परिणामी उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी ज्या अनुदानाची आवश्यकता आहे ते अनुदान प्राप्त होण्यास अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आवश्यक कार्यवाही केव्हा करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गोडाऊन इमारतीचे काम पूर्ण झाले असले तरी उर्वरित काम न झाल्याने हे बांधकाम सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्याच ताब्यात आहे. सुरवातीस या गोडाऊनच्या इमारतीसाठी वीज जोडणी घेतली होती. मात्र, गोडाऊनचा वापर होत नसल्याने त्याची जोडणी तोडली आहे. शिवाय गोडाऊनचे लोखंडी शटर गंजून गेली असल्याचे दिसून येत आहे.

चौकट
महसूल प्रशासन म्हणते...
कुंभारमाठ जरीमरीवाडी येथील शासकीय जागेत धान्य ठेवण्यासाठी गोडाऊन बांधण्यात आले आहे. मात्र, यात अनेक कामे प्रलंबित असल्याने ती पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अंदाजपत्रक देण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. परंतु, बांधकाम विभागाने त्याची कार्यवाही न केल्याने शासनाकडून मिळणारे अनुदान रखडले आहे. बांधकाम विभागाने ही इमारत ताब्यात घ्यावी, असे सांगितले. मात्र, इमारतीचे काम अपूर्ण असल्याने ती ताब्यात घेतलेली नाही. आम्ही केलेल्या पाहणीत याठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच दिसून आला. त्याचबरोबर खिडक्यांच्या काचाही चोरून नेल्याचे निदर्शनास आले आहे. याची माहिती बांधकाम विभागास देऊन आवश्यक कारवाई करण्याचे कळविले आहे.

कोट
कुंभारमाठ जरीमरीवाडी येथील शासकीय गोडाऊनचा वापर सध्या अनेक गैरप्रकारासाठी केला जात असल्याचे दिसून येत आहे. याठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. पाणी वाहून जाण्यासाठी जी गटारे बनविली आहेत त्यातही मद्याच्या रिकामा बाटल्या टाकल्या आहेत. त्यामुळे शासकीय मालमत्तांचा होणारा हा गैरवापर थांबविण्यासाठी संबंधितांवर कडक कारवाई करायला हवी.
- बबन परुळेकर, सामाजिक कार्यकर्ते

चौकट
काय आहेत समस्या
* अनेक कामे प्रलंबित असल्याने इमारत विनावापर पडून
* सार्वजनिक बांधकाम विभागाने उर्वरित कामाचे अंदाजपत्रक न बनविल्याने शासनाचे अनुदान अडकले
* इमारतीचा वापर नसल्याने या जागेचा दारू पार्ट्यांसाठी वापर
* वॉचमन नसल्याने शासकीय मालमत्तेची चोरी

चौकट
या उपायांची गरज
* इमारत परिसरातील प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावणे गरजेचे
* सीसीटीव्ही यंत्रणेची आवश्यकता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com