काजू बागायतदारांसमवेत आज बैठक

काजू बागायतदारांसमवेत आज बैठक

swt412.jpg
75274
दीपक केसरकर

काजू बागायतदारांसमवेत आज बैठक
दीपक केसरकरः उशिरा झाल्यामुळे ''त्या'' बैठकीस पोहण्यास विलंब
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ः काजू बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी वेळ दिली होती ही वस्तुस्थिती आहे. परंतु, माझी बैठक उशिरा संपल्यामुळे मला बांद्यात पोहोचायला वेळ झाला. आता पुन्हा उद्या (ता.५) भेटीसाठी वेळ दिला असून त्यांच्या सर्व विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यांनी गैरसमज करून घेऊ नये, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.
श्री. केसरकर यांनी काल (ता.३) काजू बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी वेळ दिली होती. मात्र, ते त्या ठिकाणी
अनुपस्थित राहिले. परिणामी अधिकाऱ्यांना ताटकळत राहावे लागले. या प्रकाराचा काजू बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध करत मंत्री केसरकर यांच्यावर नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात केसरकर यांनी आज पत्रक प्रसिद्धीस दिले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ''काजू बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी मी काल (ता.३) एक वाजताचा वेळ दिला होता. परंतु, माझी पूर्वीची बैठक उशिरा संपल्यामुळे मला तेथे पोहोचायला दुपारी दोन वाजले. मात्र, तत्पूर्वीच काही पदाधिकारी निघून गेल्याचे सांगण्यात आले. यावेळी मी संबंधितांशी फोनवर चर्चा करून थांबण्याची विनंती केली होती. परंतु, ते थांबले नाहीत. यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना ताटकळत ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. काजू बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांना शुक्रवारी (ता.५) मी वेळ दिला आहे. त्यावेळी त्यांच्या सर्व विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यांनी कृपया गैरसमज करून घेऊ नये, असे मंत्री केसरकार यांनी पत्रकात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com