सिंधुदुर्गात भाजपतर्फे ‘बूथ विजय अभियान’

सिंधुदुर्गात भाजपतर्फे ‘बूथ विजय अभियान’

swt414.jpg
75288
अविनाश पराडकर

सिंधुदुर्गात भाजपतर्फे ‘बूथ विजय अभियान’
अविनाश पराडकरः विविध उपक्रम राबविणार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ः लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून भाजपतर्फे जिल्ह्यात ‘बूथ विजय अभियान’ राबवण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अविनाश पराडकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. प्रत्येक बुथवर नवीन ३७० मतदार पक्षाशी जोडण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा संकल्प असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्हा भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, लोकसभा निवडणुक प्रमुख माजी आमदार प्रमोद जठार, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, अतुल काळसेकर, माजी आमदार राजन तेली, अजित गोगटे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आदी नेत्यांच्या उपस्थितीत पुढील ३५ दिवसात प्रत्येक बुथपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, प्रदेशाच्या सुचनेनुसार प्रत्येक बुथवर ‘बूथ विजय अभियान’ अंतर्गत मागच्या निवडणुकीपेक्षा ३७० मते वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. याद्वारे महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाचे मताधिक्य वाढवण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.
‘बूथ विजय अभियान’ अंतर्गत समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्य़ाचे लक्ष्य असून प्रत्येक बूथवर विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. घरोघरी पत्रके पोहोचवून मतदारांशी थेट संपर्क साधणे, प्रत्येक घर व वाहनावर स्टिकर्स लावणे, लाभार्थींशी नियमित संपर्कात राहणे, प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी भाजपचा झेंडा लावणे आदी उपक्रम राबवले जातील. युवावर्ग, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा समाजातील विविध घटकांसाठी ५ समूह बैठकाही घेण्यात येतील. मतदानापासून दूर रहाणाऱ्या मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येईल. बूथ समिती व पन्ना प्रमुखांची नियुक्ती, तसेच १०० हून अधिक जणांचा व्हॉट्स ॲप ग्रूप बनवण्यात येईल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बूथ कार्यकर्ते व पन्नाप्रमुखांचे संमेलन घेण्यात येणार आहे. संमेलनाला उपस्थित प्रत्येक बूथ अध्यक्षाला त्या त्या बूथनुसार महायुतीकडे आवश्यक ती माहिती देण्यात येणार आहे. संमेलनामध्ये बूथ समिती व पन्ना प्रमुखांकडून अपेक्षित असलेल्या कार्यावर व जबाबदारीबाबत विस्तृत चर्चाही होईल."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com