केळूस येथे मंगळवारपासून 
जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धा

केळूस येथे मंगळवारपासून जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धा

टीपः swt४१६.jpg मध्ये फोटो आहे.
श्री विठ्ठल-रखुमाई


केळूस येथे मंगळवारपासून
जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ४ : केळूस-कालवीबंदर येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात गुढीपाडवा व रामनवमी उत्सवानिमित्त मंगळवार (ता. ९) ते बुधवार (ता. १७) या कालावधीत जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धेसह धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नवतरुण उत्साही कला, क्रीडा मंडळ कालवीबंदर, श्री विठ्ठल-रखुमाई उत्सव कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
या उत्सवात ९ ला सायंकाळी ७.३० वाजता श्री देव ब्राह्मण प्रासादिक वारकरी भजन मंडळ मोबारवाडी-केळूस यांचे भजन, रात्री ९.३० वाजता सामाजिक नाट्य स्पर्धेचे उद्‍घाट, रात्री १० वाजता श्रींची इच्छा कलामंच नाट्यमंडळ, तेंडोली यांचे सामाजिक नाटक ''देव नाही देव्हाऱ्यात''. १० ला सायंकाळी ७.३० वाजता श्री ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ, परुळे यांचे भजन, रात्री १० वाजता आई सातेरी नाट्यमंडळ मालवण (देऊळवाडी) यांचे सामाजिक नाटक ''सात-बारा'', ११ एप्रिलला सायंकाळी ७.३० वाजता श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ आंदुर्ले यांचे भजन, रात्री १० वाजता अमर जवान क्रिएशन मंडळ नेतर्डे-बांदा (ता. सावंतवाडी) यांचे नाटक ''कोर्टात खेचीन'', १२ ला सायंकाळी ४ वाजता ह.भ.प. मकरंद देसाई बुवा (तेंडोली) यांचे कीर्तन, रात्री १० वाजता इंद्रधनू कलामंच दाभोली यांचे सामाजिक नाटक ''श्याम तुझी आऊस ईली रे,'' १३ ला सायंकाळी ४ वाजता ह.भ.प. स्नेहलदीप सामंत बुवा (वालावल) यांचे कीर्तन, सायंकाळी ७.३० वाजता श्री देवी तारादेवी प्रासादिक भजन मंडळ, केळूस यांचे भजन, रात्री १० वाजता मधलावाडा ग्रामस्थ, यशवंत बाल नाट्य मंडळ आचरा-पिरावाडी यांचे नाटक ''गावय'', १४ ला सायंकाळी ४ वाजता प. पू. श्री नामदेव महाराज भक्त मंडळी यांचे भजन, ७.३० वाजता श्री सिध्देश्वर प्रासादिक भजन मंडळ मुणगी यांचे भजन, रात्री १० वाजता अक्षर सिंधू साहित्य कलामंच नाट्यमंडळ कणकवली यांचे नाटक ''सुजाता मेली न्हाय'', १५ ला सायंकाळी ५ वाजता श्री ज्ञानेश्वर महाराज वारकरी भजन मंडळ, शिरोडा यांचे भजन, रात्री १० वाजता नारायणश्रीत नाट्यमंडळ आसोली (शिरोडा) यांचे नाटक ''वडाची साल पिंपळाक'', १६ ला सकाळी १० वाजल्यापासून श्री विठ्ठल नामाचा जप, सायंकाळी ५ वाजता श्री देव वेतोबा प्रासादिक वारकरी भजन मंडळ मायनेवाडी-कोचरा यांचे भजन, रात्री १० वाजता ग्रामस्थांचे भजन, ह.भ.प. उत्तम केळुसकर यांचे हनुमान जन्मावर कीर्तन, रात्री १२ वाजता हनुमान जन्म, श्रींची पालखीतून मिरवणूक व तीर्थप्रसाद. १७ ला श्री रामनवमी उत्सवानिमित्त श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात सकाळी ७ वाजल्यापासून ओटी भरणे, १० वाजता ग्रामस्थांचे भजन, श्री रामजन्मवार ह.भ.प. उत्तम केळुसकर बुवा यांचे कीर्तन, दुपारी १२ वाजता श्रीराम जन्म, श्रींची ढोलताशांच्या गजरात पालखी मिरवणूक, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता ज्योतिराज केळुसकर (खवणे) यांचे गायन, ५.३० वाजता श्री विठ्ठल-रखुमाई सचित्र वारकरी भजन मंडळ निवती यांचे भजन, रात्री ८ वाजता श्रींची पालखी मिरवणूक, रात्री १० वाजता नवतरुण उत्साही, कला, क्रीडा मंडळाचे नाटक ''जन्मदाता''. १८ ला रात्री ८ वाजता जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा, रात्री १० वाजता सामाजिक नाट्य स्पर्धा व रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नवतरुण उत्साही, कला, क्रीडा मंडळ, श्री विठ्ठल रखुमाई उत्सव कमिटी व ग्रामस्थांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com