पान एक-उभादांडामध्ये हॉटेलला भीषण आग

पान एक-उभादांडामध्ये हॉटेलला भीषण आग

75348
उभादांडा ः येथील हॉटेलला बुधवारी दुपारी भीषण आग लागली. त्यात केवळ सांगाडाच शिल्लक राहिला.

उभादांडामध्ये हॉटेलला भीषण आग
१५ लाखांची हानी; शॉर्टसर्किटमुळे प्रकार घडल्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ४ ः तालुक्यातील उभादांडा-बागायत येथील किनारपट्टीलगत असलेले एक हॉटेल आग लागून जळून खाक झाले. यात हॉटेलचे सुमारे १५ लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
हॉटेलमधील कर्मचारी दुपारी कामात व्यस्त होते. एका कर्मचाऱ्याला हॉटेलच्या एका भागात आग लागल्याचे दिसले. दुपारी किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आगीने संपूर्ण हॉटेलला वेढले. बघता बघता रौद्ररूप धारण केले. कर्मचाऱ्यांचे प्रयत्न अपुरे ठरले आणि वाऱ्यामुळे आग वाढत गेली. येथील पालिकेच्या अग्निशमन विभागाला कळविले. मात्र, बंब नादुरुस्त असल्याने कर्मचाऱ्यांनी टँकरने आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न सुरू केले. याच दरम्यान सावंतवाडी पालिकेचा बंब दुपारी दोन वाजता दाखल झाला; मात्र, तोपर्यंत किचनमधील सर्व साहित्य, धान्य, रोख रक्कम, सहा मोठे डीप फ्रीज, नऊ फॅन, १२ टेबल, ७० खुर्च्या, लॅपटॉप, संगणक, टीव्ही, वायफाय सेट, दोन मोबाईल फोन, दोन किचन फ्रीज, ३ मिक्सर व अन्य साहित्य जळून खाक झाले. करड आणि बांबूच्या साहाय्याने हॉटेल उभारले होते. मात्र, आग वाढत गेल्यामुळे सर्व जळून खाक झाले. सायंकाळी साडेचारपर्यंत आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न सुरू होते. तलाठी एन. बी. रामोड यांनी भेट देऊन पाहणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com