चिपळूण क्राईम

चिपळूण क्राईम

एसटीतून अडीच लाखांच्या दागिन्यांची चोरी

चिपळुणातील भरदिवसाचा प्रकार ; प्रवासी महिलेची तक्रार

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ : चिपळूणहून आवशी येथे एसटीतून जाण्यास निघालेल्या महिलेचे दोन लाख चाळीस हजार रूपये किमंती सोन्याचे दागिने चोरट्याने चोरून नेले. बुधवारी (ता. ३) सायंकाळी ६.३० वाजता हा प्रकार घडला. याची नोंद चिपळूण पोलिस ठाण्यात झाली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, संजना पाष्टे यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानुसार पाष्टे या अंडरे येथे आपल्या माहेरी गेल्या होत्या. सायंकाळी आवाशीला जाण्यासाठी त्या बहादूरशेख नाका येथे रत्नागिरी-संगमेश्वर-दापोली बसमध्ये चढल्या. त्यांच्या सोबत अन्य काही महिलाही बसमध्ये चढल्या. गाडी सुरू झाल्यावर काही अंतरावर त्या महिलांनी आम्ही चुकीच्या बसमध्ये बसलोय... आम्हाला रत्नागिरीत जायचे आहे असे म्हणत तीन महिला घाईगडबडीत - गाडीतून खाली उतरल्या. याच दरम्यान पाष्टे यांनी तिकीट काढण्यासाठी आपली पर्स बघितली तर त्यांना तिची चेन उघडी दिसली. त्यांना त्या पर्समध्ये ठेवलेले दोन लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व नेकलेस गायब होते. त्या महिलांनीच ही चोरी केली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत असून पाष्टे यांनी दिलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com