Olive Ridley Turtle
Olive Ridley Turtleesakal

53 दिवसांनी ऑलिव्ह रिडलेची 'इतकी' पिल्ले समुद्रात झेपावली; मिठमुंबरी समुद्रकिनारी कासव संवर्धनाला चालना

सुमारे ५३ दिवसांनी अंड्यातून पिल्ले बाहेर पडून समुद्राकडे झेपावली.
Summary

ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या एका घरट्यातील १२३ अंड्यांतून सुमारे ८१ पिल्ले, तर दुसऱ्या एका घरट्यातील ९५ पैकी सुमारे ३७ पिल्ले सुखरूपपणे बाहेर पडली.

देवगड : मिठमुंबरी (ता. देवगड) येथील समुद्रकिनारी (Mithmumbari Beach) ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची (Olive Ridley Turtle) सुमारे ११८ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. सुमारे ५३ दिवसांनी अंड्यातून पिल्ले बाहेर पडून समुद्राकडे झेपावली. यावेळी वन विभागाचे (Forest Department) कर्मचारी उपस्थित होते.

मिठमुंबरी समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या एका घरट्यातील १२३ अंड्यांतून सुमारे ८१ पिल्ले, तर दुसऱ्या एका घरट्यातील ९५ पैकी सुमारे ३७ पिल्ले सुखरूपपणे बाहेर पडली. दोन्ही घरट्यांतील मिळून सुमारे ११८ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली.

Olive Ridley Turtle
खाडीत लालभडक उगवता सूर्य, मगरीने भरलेले जगबुडीचे खोरे अन् बरंच काही; मालदोलीत असं नेमकं आहे तरी काय?

यावेळी येथील वन विभागाचे वनरक्षक नीलेश साठे, वनमजूर कृष्णा सुद्रिक यांच्यासह कांदळवन समितीचे किनारा व्यवस्थापक लक्ष्मण तारी, गाबीत समाजाचे तालुकाध्यक्ष संजय पराडकर, प्रियांका तारी आदी उपस्थित होते. ही कासव संवर्धन मोहीम राबविण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ नारायण तारी, मयूरेश तारी, ओमकार तारी यांनी मेहनत घेतली. यावेळी ग्रामस्थ प्रमोद आडकर, रोहन तारी, अभय पराडकर, नंदकिशोर पराडकर, हितेश खवळे, भूषण टिकम उपस्थित होते.

Olive Ridley Turtle
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha : उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री काळ म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक; राणेंची सडकून टीका

या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाची अंडी २० फेब्रुवारीला सकाळी ९.१५ वा. घरट्यात जमा केली होती. ही पिल्ले तब्बल ५३ दिवसांनी अंड्यातून बाहेर पडली. कासव संवर्धनच्या माध्यमातून वन विभाग सावंतवाडी, कांदळवन कक्ष मालवण व कांदळवन प्रतिष्ठान मुंबई यांच्या माध्यमातून आगामी काळात मिठमुंबरी किनाऱ्यावर कासव महोत्सव आयोजित करावा. जेणेकरून बहुसंख्य ग्रामस्थ व पर्यटकांना कासव संवर्धनाचे महत्त्व व येथील जैवविविधतेची परिपूर्ण माहिती घेता येईल, अशीही मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com