Mumbai-Goa National Highway Bus Stand
Mumbai-Goa National Highway Bus Standesakal

Summer Season : निवाऱ्याविना प्रवासी रखरखत्या उन्हात! मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा परिणाम

प्रवाशांना रखरखत्या उन्हात (Summer Season) उभे राहून वाहनांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
Summary

मुंबई-गोवा महामार्गाचे बहुतांश काम पूर्ण झाले असले, तरी अनेक ठिकाणी प्रवासी निवाराशेड नसल्याने प्रवाशांना थांब्यावर गाड्या पकडण्यासाठी ऊन-पावसामध्ये उभे राहावे लागत आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे (Mumbai-Goa National Highway) चौपदरीकरण वेगाने केले जात आहे. त्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेले मोठमोठे वृक्ष तोडण्यात आले आहेत. अनेक ठिकाणचे प्रवासी निवाराशेडही तोडण्यात आल्या आहेत. सध्या काम जोरात असल्यामुळे त्या ठिकाणी अद्यापही निवाराशेड उभारलेल्या नाहीत तसेच सावली देणाऱ्या झाडांचीही लागवड केलेली नाही. काही ठिकाणी प्रवासीशेड नव्हत्या; मात्र भलेमोठे वृक्ष प्रवाशांना सावली देत होते.

चौपदरीकरणामुळे प्रवाशांचा निवाराच हिरावला असून, सोबत उन्हाच्या झळा सहन करत एसटी किंवा वाहनांची प्रतीक्षा करत राहावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना रखरखत्या उन्हात (Summer Season) उभे राहून वाहनांची प्रतीक्षा करावी लागत आहे. याकडे ना प्रशासनाचे लक्ष ना चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदारांचे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम दहा टप्प्यांत सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन करण्यात आले. त्यातील झाडे तोडण्यात आली.

Mumbai-Goa National Highway Bus Stand
Kolhapur Lok Sabha : कुणाच्या तरी पराभवासाठी 'ते' माझ्यासोबत आले; गौप्यस्फोट करत मंडलिक सतेज पाटलांबद्दल काय म्हणाले?

यामध्ये असलेल्या प्रवाशांच्या निवाराशेडचाही समावेश आहे. राजापूर (Rajapur) तालुक्यातील काही भागामध्ये काम पूर्ण झाले तरीही निवाराशेड उभारलेल्या नाहीत, तर दुसऱ्या बाजूला अनेक ठिकाणी काम सुरू असल्यामुळे तिथे पर्याय करता येत नाही. महामार्गावर अनेक ठिकाणी वाहनथांबे आहेत; पण तिथे प्रवासीशेड नव्हत्या. अशा ठिकाणी अनेक वर्षांपासून उभे असलेले मोठे वृक्ष निवाऱ्याचे काम करतात. गेल्या काही दिवसात उन्हाची तीव्रता वाढत आहे. सकाळी अकरा वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उन्हात उभे राहणेही त्रासदायक ठरत आहे. त्याचा त्रास खेड ते राजापूर या टप्प्यात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

वाहनांच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना उन्हाळ्यातील रखरखटाचा त्रास सहन करावा लागत आहे. पारा सुमारे ३६ अंशावर पोहोचल्याने उन्हाच्या झळाही अधिक जाणवत आहेत. दुपारी उन्हात गाड्यांची प्रतीक्षा करणारे प्रवासी उष्म्याने हैराण होत आहेत. गाडी येईपर्यंत जास्त कालावधी झालाच तर त्याची तीव्रता आणखीनच वाढते. अनेक प्रवासी थांब्याच्या जवळ असलेली एखादी टपरी किंवा सावलीचा शोध घेतात. काहीवेळा बस थांबते त्यापासून सावलीच्या ठिकाणी थांबावे लागते. वाहन आले की, धावपळ करत थांब्यावर येण्याची कसरत करावी लागते. यामध्ये सर्वाधिक त्रास वयोवृद्ध आणि महिलांना होतो.

Mumbai-Goa National Highway Bus Stand
'लोकसभे'त सात कुटुंबांचेच वर्चस्व! 1977 पासूनचा इतिहास; कोल्हापुरातून गायकवाड-मंडलिक सर्वाधिक वेळा खासदार

हिरवाई हरवली

वारंवार होणाऱ्‍या अपघातांमुळे महामार्ग धोकादायक असला तरी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या मोठमोठ्या वृक्षराजी आणि झाडांमुळे निर्माण झालेल्या सावलीतून प्रवास करणे आल्हाददायक ठरत होते. मोठमोठे वृक्ष तोडण्यात आल्यामुळे त्याचा फटका वाहनचालकांना आणि पर्यटकांना बसत आहे. दुतर्फा झाडी नसल्यामुळे महामार्गाने दुपारच्यावेळी प्रवास करणे त्रासदायक ठरत आहेत. दुचाकीवरून प्रवास करताना उन्हाने तापून जीव कासावीस झाला तर सावलीचा शोध घ्यावा लागतो.

पाण्याअभावी झाडे गेली सुकून

काम पूर्ण झालेल्या राजापूर परिसरात महामार्गाच्या मधोमध लावलेली झाडे एक दिवसाआड पाणी दिल्यामुळे सुकून गेली आहेत. रखरखत्या उन्हात ती जिवंत राहणे अशक्य आहे. काही भागातील झाडे मरूनही गेली आहेत. ज्या उद्देशाने ही झाडे लावण्यात आली आहेत तो सफल झालेला नाही. झाडे लागवडीचा केवळ फार्स होत आहे.

Mumbai-Goa National Highway Bus Stand
राष्ट्रवादीच्या जगतापांचे बंड शमले; शरद पवार, जयंत पाटलांनी काढली समजूत, माढ्यात देणार मोहिते-पाटलांना साथ

आश्वासनापुरतीच वृक्ष लागवड

महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे वृक्षांची तोड केली असली तरीही नव्या झाडांच्या लागवडीकडे दुर्लक्ष झाले आहे. नव्याने लावण्यात आलेली बहुतांश झाडे शोभेची आणि कमी उंचीची आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूला काजूची झाडे लावण्यात आलेली आहेत; मात्र, त्यांची सद्यःस्थितीत झालेली वाढ आणि भविष्यात होणारी वाढ लक्षात घेता ही झाडे सावलीसाठी उपयुक्त नाहीत. सावली देणारी झाडे लावण्यात आलेली नसल्यामुळे भविष्यात या महामार्गाचे निसर्गसौंदर्य हरवणार आहे.

महामार्गावर निवाराशेडची येथे प्रतीक्षा

चिपळूण तालुका ः परशुराम, वालोके, कळंबस्ते, कामथे, कापसाळ, सावर्डे, तेरशे, आसुर्डे, कोंडमळा, आगवे. संगमेश्‍वर ः आरवली, धामणी, पुरळ, वांद्री, बावनदी रत्नागिरी ः निवळी, हातखंबा खेड ः लोटे, शिवफाटा, लवेल, भरणे लांजा ः वाकेड राजापूर ः ओणी, राजापूर एसटी डेपो, हातिवले, गंगातीर्थ-उन्हाळे, कोंड्ये, गुंजवणे

Mumbai-Goa National Highway Bus Stand
Sangli Lok Sabha : संजय पाटील, विशाल पाटील कोट्यधीश; 'मविआ'चे उमेदवार चंद्रहार पाटलांची किती आहे संपत्ती?

मुंबई-गोवा महामार्गाचे बहुतांश काम पूर्ण झाले असले, तरी अनेक ठिकाणी प्रवासी निवाराशेड नसल्याने प्रवाशांना थांब्यावर गाड्या पकडण्यासाठी ऊन-पावसामध्ये उभे राहावे लागत आहे. प्रवासी निवाराशेड तत्काळ बांधावेत, याची सातत्याने प्रशासनासह बांधकाम विभागाकडे निवेदनांद्वारे मागणी करत आहेत. त्याकडे त्यांच्याकडून दुर्लक्ष केले आहे. त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. त्याला नेमके जबाबदार कोण?

-अरविंद लांजेकर, राजापूर तालुकाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा

अनेक ठिकाणच्या बसथांब्यांवर प्रवासीशेड नाही. त्यामुळे प्रवाशांना उन्हाळ्यात रखरखत्या उन्हात, तर पावसाळ्यामध्ये हातामध्ये छत्री धरून भररस्त्यावर उभे राहावे लागत आहे. दुसऱ्‍या बाजूला रस्त्याच्या दुतर्फा पूर्वी मोठमोठी झाडे असल्याने गाड्यांमधून प्रवास करताना फारसा त्रास होत नव्हता; मात्र, आता झाडे नसल्याने गाडीतून प्रवास केला तरी रखरखत्या उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महामार्गावरील प्रवास नकोसा वाटत आहे. यावर संबंधितांनी वेळीच योग्य त्या उपाययोजना कराव्यात.

- प्रतीक शिंदे, प्रवासी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com