चिपळुणातील व्यवसायिकांना साहित्य वाटप

चिपळुणातील व्यवसायिकांना साहित्य वाटप

२१ (पान ४ साठी, संक्षिप्त)

- rat२४p१०.jpg ः
२४M७९४९१
चिपळूण ः साहित्य वितरण करताना अशोक कदम व पदाधिकारी.

चिपळुणातील गरजूंना व्यवसाय साहित्य

चिपळूण ः ब्लू डार्ट एक्स्प्रेस लिमिटेड, मुंबई आणि परिवर्तन संस्था, चिपळूण यांच्या माध्यमातून तालुक्यात व्यवसायवृद्धी उपक्रम राबवला जात आहे. या अंतर्गत शिरळ, खोपड, कालुस्तेबुद्रुक, करंबवणे, केतकी, भिले, वैजी, रेहेळ भागाडी, खांदाटपाली आणि निरबाडे अशा दहा गावातील गरजूंना आवश्यक व्यवसायविषयक साहित्य वाटप करण्यात आले. त्यामध्ये ३३ उद्योजकांना व्यवसायवृद्धीसाठी वितरित केलेल्या उपजीविकेच्या संसाधनांमध्ये चार घरघंटी, १२ फूल शटल शिलाई मशिन व फॉल बिडिंग मशिन, इस्त्री टेबलसहित फणस गरे कटिंग मशिन, टू व्हीलर टूल कीट, ड्रिल मशिन, वूड टर्निंग मशिन, ब्युटीपार्लर चेअर, वेल्डिंग मशिन, कार पॉलिश मशिन, ग्राईंडर, वॉलचेसर, सुगंधी अगरबत्ती व वजनकाटे, मच्छीमार महिलांसाठी शीतपेटी आणि वजनकाटा, फायबर होडी यांचा समावेश आहे.
-------------------------------

संस्कृत संभाषण शिबिर चिपळुणात

चिपळूण ः येथील विद्याभारती शिशुमंदिरात संस्कृत भारतीतर्फे संस्कृत संभाषण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. संस्कृत भारती ही सेवाभावी संघटना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर संस्कृत प्रचारप्रसाराचे कार्य करते. उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात या संस्थेच्यावतीने संस्कृत संभाषण शिबिराचे आयोजन १ ते १० मे या कालावधीत दररोज दोन तास सायंकाळी ४ ते ६ या वेळेत करण्यात आले आहे. विद्याभारती आणि डीबीजे महाविद्यालयाचा संस्कृत विभाग यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी संस्कृतच्या पूर्वज्ञानाची आवश्यकता आहे. वयोमर्यादा १३ वर्षांपासून पुढील सर्वांसाठी हे शिबिर खुले आहे.
----

‘डीबीजे’ला आयएसओ मानांकन

चिपळूण : येथील नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालय शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षात शैक्षणिक मानांकनाला सामोरे गेले. यासाठी १५ व १६ एप्रिल हे दोन दिवस आयएसओ समिती महाविद्यालयाला भेट देऊन पूर्ण तपासणी केली. या आधी मागील तीन वर्षांपासून डीबीजे महाविद्यालय आयएसओ मानांकनप्राप्त महाविद्यालय आहे; मात्र आताचे आयएसओ मानांकनाचे वेगळेपण म्हणजे हे मानांकन हे शैक्षणिक मानांकन आहे. त्यामध्ये महाविद्यालयाला २१०१ ः २०१८ हे आयएसओ मानांकन प्राप्त केले आहे. या वेळी ऑडिटर म्हणून रत्नकुमार चंद्रात्रे, श्रीमती सेजल रूपलग, सल्लागार समीर रूपलग यांनी काम पाहिले. हे आयएसओ मानांकन प्राप्त करणारे डीबीजे महाविद्यालय हे कोकणातील पहिले महाविद्यालय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com