रायगड लोकसभा मतदार संघात निश्चितच बदल

रायगड लोकसभा मतदार संघात निश्चितच बदल

३४ (पान ५ साठी)

रायगड मतदार संघात निश्चितच बदल

जयंत पाटील; निवडणुकीत मतदार जागा दाखवतील

सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २५ : गेल्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांनी फसवलं आहे. माणिक जगताप यांना तटकरेंनी स्वार्थासाठी पाडले आहे. फक्त स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्या तटकरे यांना या निवडणुकीत मतदार त्यांची जागा दाखवून रायगड लोकसभा मतदार संघात निश्चितच बदल घडवतील, असा विश्वास शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
माणगाव मोरबे येथे आयोजित इंडिया आघाडीच्या शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत पाटील बोलत होते. रायगडमध्ये अनंत गीते यांचा महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्क्याने विजय होईल, असाही दावा जयंत पाटील यांनी केला. या वेळी व्यासपीठावर महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते, जितेंद्र आव्हाड, सुषमा अंधारे आदी नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
सुनील तटकरे यांचे मोठे बंधू अनिल तटकरे व्यासपीठावरती उपस्थित होते. अनिल तटकरे यांना देखील सुनील तटकरे यांनी फसवले. पवारसाहेबांनी यांना घडवलं, मोठं केलं, वाढवलं, सगळी मंत्रिपदे दिली, अर्थखाते दिले. त्यांच्याकडे भरपूर खोके आहेत. आता फक्त नातवाला आमदार करायचं राहिलं असल्याचे पाटील यांनी सांगितले.
------------------------------

शेकाप ज्याच्या बाजूने त्याचा विजय

कालपर्यंत यांनी मोदींना शिव्या घातल्या आणि एका दिवसात मोदींचे गोडवे गायला लागलेत. अजित पवार म्हणतात, मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आम्हाला मत द्या. मग इतके दिवस तुम्ही काय करत होता, असा सवाल करत जयंत पाटील यांनी अजित पवारांवर टीका केली. रायगड जिल्ह्यात आमची ५ लाख शेकापची मतं आहेत, असाही दावा करत जयंत पाटील म्हणाले, या जिल्ह्यामध्ये शेकाप ज्याच्या बाजूने असतो त्याचा विजय होतो ही काळ्या दगडावरची रेष आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com