हिंदुंमधील शौर्य वाढण्यासाठी जिल्ह्यात २८ ठिकाणी गदापूजन

हिंदुंमधील शौर्य वाढण्यासाठी जिल्ह्यात २८ ठिकाणी गदापूजन

२२ (टुडे ३ साठी, मेन)

rat२५p२.jpg-
P२४M७९७०६
चिपळूण : वेस मारूती मंदिर येथे गदापूजन कार्यक्रमाला उपस्थित अमित जोशी, निखिल किल्लेकर, अभिनव भुरण, विक्रम जोशी, महेश लाड, केशव अष्टेकर आदी.

शौर्यवाढीसाठी जिल्ह्यात २८ ठिकाणी गदापूजन

हनुमान जयंतीनिमित्त आयोजन; आध्यात्मिक बळ, शंखनाद, आरती, स्तोत्रपठणही

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : हिंदू जनजागृती समिती व समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदू धर्माभिमानी नागरिकांनी जिल्ह्यात विविध २८ ठिकाणी गदापूजन कार्यक्रम केला. हिंदूंमधील शौर्य वाढण्यासाठी, राममंदिराला बळ मिळण्यासाठी याचे आयोजन केले. या सर्व कार्यक्रमात ९०० धर्मप्रेमी, भाविक उस्फूर्तपणे सहभागी झाले होते.
श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने ‘गदापूजना’च्या माध्यमातून हिंदूंमधील शौर्य जागृत व्हावे आणि रामराज्याच्या कार्यासाठी आध्यात्मिक बळ मिळावे, या उद्देशाने हिंदू जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या सहभागाने देशभरात ७५७ ठिकाणी सामूहिक गदापूजन करण्यात आले. कार्यक्रमांची सुरवात शंखनादाने झाली. त्यानंतर सामूहिक प्रार्थना, गदापूजन विधी, श्री हनुमानाची आरती, मारूती स्तोत्रपठण केल्यानंतर श्री हनुमते नम: हा सामूहिक नामजप करण्यात आला. या वेळी धर्मसंस्थापनेसाठी मारूतीरायांचे गुण कसे आत्मसात करावेत या विषयी मार्गदर्शनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली.
या गदापूजनामागील भूमिका स्पष्ट करतांना हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे म्हणाले, युगानुयुगे मारूतिरायांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून ओळखली जाते ती म्हणजे त्यांची गदा. याच दैवी गदेने मारूतिरायांनी अनेक बलाढ्य असूर, राक्षसांचा संहार करून प्रभू श्रीरामचंद्रांच्या रामराज्यासाठी मोठे योगदान दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठीही समर्थ रामदास स्वामींनी ११ मारूतींची स्थापना करून मावळ्यांकडून बलोपासना करवून घेतली. आता पुन्हा अयोध्येत ५०० वर्षांनंतर एकदा श्रीरामलल्ला विराजमान झालेले आहेत. अशा वेळी पुन्हा एकदा रामराज्याच्या स्थापनेसाठी हिंदूंनी मारूतीरायांप्रमाणे भक्तीची अन् शौर्याची उपासना करणे आवश्यक आहे.
चिपळूण येथील वेस मारूती मंदिर येथे उद्योजक अमित जोशी, निखिल किल्लेकर, अभिनव भुरण, विक्रम जोशी, आशीर्वाद लोखंडे, अनुराग रायकर, ओमी कदम, सूरज कदम, अंकिता बनसोडे, हिंदू जनजागृती समितीचे महेश लाड, सनातन संस्थेचे केशव अष्टेकर आदी उपस्थित होते.

--------
देशात ७५७ ठिकाणी कार्यक्रम

गदापूजनाचा कार्यक्रम मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, अमरावती, यवतमाळ यांसह महाराष्ट्रभरात ६४२ ठिकाणी झाला. गोवा राज्यात ३०, कर्नाटकात ४१, पश्चिम बंगाल १०, पूर्व उत्तरप्रदेश ६, मध्यप्रदेश आणि राजस्थान १४, नवी दिल्ली, हरियाणा आणि पश्चिम उत्तरप्रदेश १४ तर देशभरात एकूण ७५७ ठिकाणी सामूहिक गदापूजन झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com