दोनशेजणांनी घेतला पुस्तक वाचनाचा आनंद

दोनशेजणांनी घेतला पुस्तक वाचनाचा आनंद

२५ (टुडे ३ साठी)

rat२५p८.jpg-
२४M७९७१२
रत्नागिरी : जागतिक पुस्तकदिनानिमित्त डाएट, आगाशे विद्यामंदिरतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना प्राचार्य सुशील शिवलकर. सोबत मान्यवर.

विद्यार्थ्यांनी घेतला पुस्तक वाचनाचा आनंद

आगाशे विद्यामंदिरात प्रदर्शन ; ‘डाएट’चा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : जागतिक पुस्तकदिनानिमित्त जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) आणि भारत शिक्षण मंडळाचे कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यामंदिरात पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले होते. दिवसभारात दोनशेहून अधिक विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी पुस्तक वाचनाचा आनंद घेतला.
या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन डाएटचे प्राचार्य सुशील शिवलकर यांनी केले. ग्रंथदिंडी, ग्रंथपूजन, पुस्तकांची आकर्षक मांडणी‌ या वेळी करण्यात आली होती. नाट्यलेखक अनिल दांडेकर, बालसाहित्यिक संतोष गार्डी या स्थानिक लेखकांचा सत्कार करून त्यांनी लेखक कसा घडला, या विषयावर अनुभव कथन केले. तिसरीचा विद्यार्थी युवराज कारकर याने पुस्तक महतीवर काव्यवाचन सादर केले. आगाशे शाळेच्या ग्रंथपाल आभा घाणेकर यांचा उत्कृष्ट ग्रंथपाल म्हणून सत्कार करण्यात आला. आगाशे प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम यांनी स्वागत केले.
डाएटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता व या कार्यक्रमाचे प्रमुख प्रा. राहुल बर्वे यांनी जागतिक पुस्तकदिनाची माहिती सांगून प्रस्तावना केली. लेखक, दिग्दर्शक दांडेकर, बालसाहित्यिक गार्डी, विद्यालयाचे प्रबंधक तथा भारत शिक्षण मंडळाचे सदस्य विनायक हातखंबकर, डाएटच्या ज्येष्ठ अधिव्याख्याता दीपा सावंत, ग्रंथालय अधिकारी हेमंत काळोखे यांनी समयोचित विचार मांडले. सुशील शिवलकर यांनी पुस्तकांना आपला मित्र बनवा, या विषयी सुंदर विचार ओघवत्या शैलीत मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुधीर शिंदे यांनी केले. अश्विनी काणे यांनी प्रशासनामार्फत आभार मानले. आगाशे विद्यांमदिर व विजू नाटेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडीत भाग घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com