मत गमंत

मत गमंत

२७ (निवडणूक पानासाठी)

मत-गंमत-------लोगो

तुमचं मतदान महत्वाचं...!


या सुखांनो या.. होऊद्या घर नांदते.. अशी गाण्याची धून सकाळी फक्त रेडिओवर ऐकायला मिळत असे. सध्या रेडिओचा वापर कमी झाला आणि दूरदर्शन आणि मोबाईलचा जमाना आला. ग्रामीण व शहरी भागातील जुनेजाणते बुजुर्गच फक्त रेडिओ नित्यनियमाने ऐकतात, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. गावातील नानूकाका मात्र या सगळ्याला अपवाद होता, धार्मिक होता; पण दुसऱ्याची ऐकून घेणे, सुमधूर संगीत ऐकणे कधी पटलेच नाही. फक्त राजकीय बातम्या ऐकत असे. अर्धवट ऐकलेल्या बातम्या पसरवण्यात त्यांचा हातखंडा होताच तसेच दुसऱ्याबद्दल वाईट बोलण्याची सवय कधी त्याची गेली नाही. नकारघंटा त्याच्या पाचवीलाच पुजलेली. येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृती गावागावात, वाडीवस्तीत होत आहे. एक दिवस नानूकाकाच्या गावात काही मंडळी आली. गावातील सर्व बुजुर्ग मंडळी जमा झाली. त्यांनी मतदान कसे करावे, याची माहिती देत असताना नानूकाकाचे काहीतरी वेगळेच. सायबानू, तुम्ही सांगताव ते खरं हाय; पन आजवर आमी मतदान केलाव पण आमचे रस्ते, पाखाड्या अजून तशाच हायतं. आमदार-खासदार गावात आलं की, धुरळा उडवतात. पुन्हा कोन तीकडं बघत नाय, सगलं ''येरे माझ्या मागल्या'', असं होतंय बगा. मतदार म्हणून आमची किमंत नाय काय ओ? सायब आम्ही फक्त भाषनाच ऐकायची का? यावर मतदान माहिती देण्यासाठी आलेल्या सायबाला काय बोलावे कळेना. कारण, वस्तुस्थिती तशीच होती. गावातील रस्ते, पाणी अशा अनेक समस्या होत्या; पण नानूकाकाची नकारघंटा सुरूच होती. शेवटी गावकारानं पुढे येऊन सांगितले, तुमचं मतदान महत्वाचं आहे तेव्हा हे काय ध्यानी ठेवा....!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com