वडाचापाट येथे 
क्रिकेट स्पर्धा

वडाचापाट येथे क्रिकेट स्पर्धा

वडाचापाट येथे
क्रिकेट स्पर्धा
मसुरे ः वडाचापाट येथील नवतरुण मित्रमंडळातर्फे तेथील पाताडेवाडी, ब्राह्मणवाडी येथे अंडरआर्म बॉक्स लॉक हॅण्ड नाईट क्रिकेट स्पर्धा २७ ते २९ एप्रिल दरम्यान आयोजित केली आहे. शनिवारी (ता. २७) एक गाव एक संघ स्पर्धा तर रविवारी (ता. २८) व सोमवारी (ता. २९) खुली क्रिकेट स्पर्धा होणार आहे. विजेत्या संघांना अनुक्रमे ८०२४, ४०२४, २०२४ रुपये व चषक तसेच उत्कृष्ट, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, सामनावीर अशी पारितोषिके आहेत. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी सचिन पाताडे, दिनेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
---
तळवडे येथे उद्या
‘करून गेलो गाव’
सावंतवाडी ः तळवडे-म्हाळाईवाडी येथील दाळकर देवस्थान येथे शनिवारी (ता. २७) देव दाळकर देवस्थानचा वार्षिक उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त रात्री ९ वाजता राजेश देशपांडे लिखित-दिग्दर्शित, भाऊ कदम, ओंकार भोजने अभिनीत ‘करून गेलो गाव’ हा ओपन शो होणार आहे. रात्री १ वाजता नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन बबन परब, बंड्या परब, तुकाराम परब यांनी केले आहे.
.............
मालवणात रविवारी
अभिवाचन कार्यक्रम
मालवण : निलायम व राज्य मराठी विकास संस्था, मुंबईच्या सहकार्याने येथील बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे जी. ए. कुलकर्णी शताब्दी संस्मरण अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन मालवण येथे रविवारी (ता. २८) सायंकाळी ६ वा. केले आहे. हा कार्यक्रम बॅ. नाथ पै सेवांगण येथे आयोजित केला आहे. कार्यक्रमात संजय शिंदे (कथा-पडदा), ज्योती तोरसकर (कथा-नाग), वामन पंडित (कथा-दीपस्तंभ) हे अभिवाचन करणार आहेत.
...............
मळगावात रविवारी
दशावतारी नाटक
सावंतवाडी : मळगाव-रेडकरवाडी येथील देव इस्वटी प्रासादिक मंडळातर्फे रविवारी (ता. २८) विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त सकाळी श्रींची महापूजा, आरती, तीर्थप्रसाद व रात्री ९ वा. पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ, वेंगुर्लेचा ‘श्री गणेश हनुमान युद्ध’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com