आंब्रडमध्ये हनुमान जयंतीदिनी विविध नृत्याविष्कारांनी रंगत

आंब्रडमध्ये हनुमान जयंतीदिनी विविध नृत्याविष्कारांनी रंगत

swt251.jpg
79742
आंब्रडः येथील बाजारपेठ हितवर्धक संघाच्या वतीने नृत्यांगना मृणाल सावंत हिचा सन्मान करताना योगेश पारकर, कल्पिता मुंज, किरण पारकर आदी. (छायाचित्रः अजय सावंत)
  
आंब्रडमध्ये हनुमान जयंतीदिनी
विविध नृत्याविष्कारांनी रंगत
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २५ः जिल्ह्यातील मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आंब्रड बाजारपेठ हितवर्धक संघाच्यावतीने हनुमान जयंतीनिमित्त नृत्याविष्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील नामांकित नृत्य कलाकारांसह आंब्रड गावातील स्थानिक नृत्य कलाकारांनी विविध नृत्याविष्कार सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. हा कार्यक्रम आंब्रड बाजारपेठ येथील श्री हनुमान मंदिराच्या रंगमंचावर बुधवारी (ता. २४) रात्री पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक रघुनाथ मुंज यांनी श्रीफळ वाढवून केले. यावेळी आंब्रड बाजारपेठ हितवर्धक संघाचे अध्यक्ष राजू मुंज, सचिव स्वप्नील मुंज, विपीन भोगटे, योगेश पारकर, जीवन लाड, अजय सावंत, केशव उर्फ आबा मुंज, कल्पिता मुंज, किरण पारकर, हेमंत राऊळ आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात कथ्थक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत, सायली राऊळ, पूर्वा मेस्त्री, नेहा जाधव, स्वरा पावस्कर, वैष्णवी मुणनकर, दिशम परब, हर्षदा गावकर, ओमकार लांजेकर, सृष्टी पवार, प्रयेश पवार, यश पवार, नेहा गरुड या कलावंतांनी विविध नृत्याविष्कार सादर केले. मुलांच्या पालकांनी सुद्धा नृत्य करीत कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हितवर्धक संघासह हेमंत राऊळ, ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन आबा मुंज व किरण पारकर यांनी केले. आभार स्वप्नील मुंज यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com