''एनएनएमएस'' परीक्षेत जनता विद्यालयाचे यश

''एनएनएमएस'' परीक्षेत जनता विद्यालयाचे यश

जनता विद्यालयाचे यश
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ः डिसेंबर २०२३ मध्ये घेतलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजना परीक्षेत तळवडे येथील श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या माध्यमिक प्रशालेने उल्लेखनीय यश संपादन केले. या विद्यालयाचे सहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यातील दोघांची राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.
यावर्षीही प्रशालेने या परीक्षेतील उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे. कौस्तुभ दळवी याने सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये ११० गुणांसह जिल्ह्यात १७ वा व तालुक्यात चौथा, श्रेयस परब यांने १०४ ‌गुणांसह सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये जिल्ह्यात २६ वा, तालुक्यात सातवा क्रमांक प्राप्त केला आहे. गौरवी गावडे, रामचंद्र परब, सायली आचरेकर, वेदिका मोर्ये हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई, पर्यवेक्षक दयानंद बांगर, सर्व संस्थाचालक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com