पाणीयोजनेच्या पाइपलाइनसाठीचे खड्डे ठरताहेत जीवघेणे

पाणीयोजनेच्या पाइपलाइनसाठीचे खड्डे ठरताहेत जीवघेणे

१२ (टूडे १ साठी)
-----------
- rat२५p१६.jpg -
२४M७९७४९
रत्नागिरी ः तालुक्यातील कुर्धे नळपाणी योजनेकरिता पाईप टाकण्यासाठी खोदण्यात आलेला भाग न बुजवल्यामुळे धोकादायक ठरत आहे.

पाइपलाइनसाठीचे खड्डे ठरताहेत जीवघेणे

कुर्धे परिसरातील प्रकार; अपूर्ण कामामुळे ग्रामस्थांची नाराजी

सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २५ ः रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे येथे केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नळपाणी योजना मंजूर झाली आहे. सव्वाकोटीचा निधी मंजूर झाला असून, सहा महिन्यापूर्वी कामाला सुरवात झाली. पाइपलाइन टाकण्यासाठी गावात ठिकठिकाणी चर खोदण्यात आले होते ते अद्यापही बुजवलेले नाहीत. परिसरात फिरणारी जनावरे आणि माणसांना धोकादायक ठरत आहेत. तेथील काम तातडीने पूर्ण करून खड्डे भरावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
जलजीवनअंतर्गत नळपाणी योजनेचे काम कुर्धे येथे केले जात आहे. मागील वर्षी मे महिन्यामध्ये या योजनेकरिता दोन विंधन विहिरी खोदण्यात आल्या होत्या. नोव्हेंबरपासून या योजनेच्या कामाला सुरवात करण्यात आली. त्यामध्ये साठवण टाकीचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक घरात नळ देण्यासाठी या कातळावरील भागात पाइपलाइन टाकण्यासाठी खोदाई करण्यात आली; परंतु खोदाईनंतर पाइपलाइन टाकण्यात आली. अनेक भागांमध्ये खोदण्यात आलेला भाग अजूनही बुजवलेले नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे उघडे आहेत. हे काम असेच ठेवून ठेकेदार गायब झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. या परिसरात फिरणाऱ्यांना याचा त्रास होत आहे. खड्ड्यांमध्ये पडून दुर्घटना घडण्याची भीती आहे. तसेच विंधन विहीर व पाण्याची टाकी तयार झाली आहे तर उर्वरित काम अपुरे कसे ठेवले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या संदर्भात ग्रामपंचायतीने संबंधित ठेकेदाराला जाब विचारला पाहिजे, असे ग्रामस्थांचे मत आहे. पाणी योजनेच्या कामासंदर्भात साठवण टाकीजवळ फलक लावून काम झाल्याचे वर्णन करण्यात आले आहे; मात्र प्रत्यक्षात काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे याबाबत ग्रामपंचायतीने तातडीने संबंधितांवर कारवाई करावी आणि पाणी योजना सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com