शास्त्री पुलाजवळील दिशादर्शक फलक गायब

शास्त्री पुलाजवळील दिशादर्शक फलक गायब

३ (टूडे १ साठी)

- rat२५p१०.jpg- -
२४M७९७१५
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शास्त्री पुलाजवळील दिशादर्शक फलक लावलेले नाहीत.
- rat२५p११.jpg-
P२४M७९७१६
महामार्गावर सुरू असलेले काम.

शास्त्री पुलाजवळील दिशादर्शक फलक गायब

मुंबई-गोवा महामार्ग ; वाहनचालकांचा उडतो गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २५ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सोनवी आणि शास्त्रीपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे; मात्र शास्त्रीपुलावर दिशादर्शक फलक नसल्यामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. याची ठेकेदारासह संबंधित प्रशासनाने काळजी घेणे आवश्यक आहे, अशी नाराजी वाहनचालक आणि प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेल्या आरवली ते बावनदी पुलापर्यंत चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे रखडलेले काम हाती घेण्यात आले असले तरी ठेकेदार कंपनीकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत नसल्याने महामार्गावर वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे तसेच अपघातही घडत आहेत. शास्त्रीपुलावर गणपतीपुळेकडे जाण्यासाठीचा मार्ग खुला केला आहे; मात्र काही दिवसांपूर्वी मुंबई-गोव्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खुला करण्यात आलेला पूल बंद केला. याबाबत योग्य ती सूचना फलकांद्वारे देणे गरजेचे होते; परंतु तसे न केल्याने अनेकवेळा वाहतूककोंडी होत आहे तसेच चालक गाड्या पुढे घेऊन गेल्यानंतर पुढील मार्ग बंद असल्याचे लक्षात आल्यावर पुन्हा माघारी परतत आहेत. याच गोंधळामुळे काही दिवसांपूर्वी सोनवी पुलाजवळ अपघात घडला होता. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बसचालकाच्या लक्षात येत नसल्याने अनेकवेळा बसेस पुलावरून पुढे जातात; मात्र मध्येच त्यांना थांबावे लागत आहे. त्यामध्ये प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. ठेकेदार कंपनीने याबाबत योग्य ती कारवाई करावी नाहीतर आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा वाहनचालकांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com