मतदान यंत्राची सरमिसळ पूर्ण

मतदान यंत्राची सरमिसळ पूर्ण

९ (टूडे १ साठी, संक्षिप्त)


मतदान यंत्रांची
द्वितीय सरमिसळ पूर्ण

रत्नागिरी ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात ७ मे रोजी मतदान होत आहे. यासाठी प्राप्त मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, निवडणूक निरीक्षक सर्वसाधारण राहुल यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. मतदान प्रक्रियेसाठी मतदार संघात एकूण २ हजार ७९३ बॅलेट युनिट, २ हजार ७९३ कंट्रोल युनिट व २ हजार ९०१ व्हीव्हीपॅट प्राप्त झाले आहेत. त्याची प्रथम सरमिसळ प्रक्रिया यापूर्वी झाली आहे. आजच्या प्रक्रियेदरम्यान मतदार केंद्रनिहाय देण्यात येणाऱ्या मतदान यंत्राच्या क्रमांकांची ऑनलाईन पद्धतीने सरमिसळ प्रक्रिया करण्यात आली. या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, सिंधुदुर्ग उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) तथा ईव्हीएम व्यवस्थापन नोडल अधिकारी मारूती बोरकर यांच्यासह उमेदवारांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी उपस्थित होते.

युवासेनेचे बूथ तिथे
निष्ठावंत यूथ अभियान

रत्नागिरी ः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांची प्रचारयंत्रणा सुरू आहे. रत्नागिरी युवासेना त्यात सक्रिय झाली आहे. तालुक्यात बूथ तिथे निष्ठावंत यूथ हे अभियान युवासेना राबवत आहे. प्रचारयंत्रणा अधिक भक्कम करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. युवासेना तालुकाप्रमुख प्रसाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान प्रत्येक पंचायत समिती गणात राबवण्यात येत आहे. प्रत्येक जिल्हा परिषद गटात युवासेना भक्कम असून, युवकांचे जाळे अधिक मजबूत करण्यात येत आहे. युवासेना बळकट करण्यासाठी सावंत यांनीच तळागाळातील युवकांच्या बैठका सुरू केल्या आहेत. त्यामधून तालुक्यात युवकांची फळी अधिक वाढणार आहे. विरोधी पक्षातील युवकही त्यांच्या संपर्कात असल्यामुळे त्याचा फायदाही होईल. या अभियानातून युवकांचे मोठे पाठबळ विनायक राऊत यांना मिळवून देण्याचा निश्चय प्रसाद सावंत यांनी केला आहे.

संरक्षणात मतपेट्या
चिपळुणात दाखल

चिपळूण : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी ७ मे रोजी मतदान होत असून, यासाठी आवश्यक मतपेट्या रवाना झाल्या आहेत. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्रांमध्ये मतपेट्यांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी विशेष स्ट्राँगरूम तयार करण्यात आली असून, २४ तास पोलिस संरक्षणात इलेक्ट्रॉनिक मतपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. मतपेट्यांची सरमिसळ केल्यानंतर जिल्हा निवडणूक शाखेकडून ३०० मतपेट्या चिपळूण विधानसभा मतदार संघात १५ दिवसांपूर्वीच पाठवण्यात आल्या. या मतपेट्या सर्व तांत्रिक चाचण्या पार करूनच पाठवण्यात आल्या आहेत. चिपळूण विधानसभा मतदार संघातील इलेक्ट्रॉनिक मतदान आणि व्हीव्हीपॅट यंत्र ठेवण्यासाठी युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. मतपेट्यांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र पोलिसांचा सशस्त्र पहारा देण्यात येत आहे. याची संपूर्ण जबाबदारी चिपळूण प्रांताधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com