केबीबीएफ व्यावसायिक संघटनेतर्फे कार्यक्रम

केबीबीएफ व्यावसायिक संघटनेतर्फे कार्यक्रम

२६ (पान ४ साठी)

‘केबीबीएफ’ व्यावसायिक संघटनेतर्फे उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : कऱ्हाडे ब्राह्मण बेनेव्होलंट फाउंडेशन म्हणजे केबीबीएफ या समस्त कऱ्हाडे ब्राह्मण व्यावसायिकांच्या संघटनेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. केबीबीएफ आणि उद्योजक ज्ञातीबांधवांचा मेळावा पुढील वर्षी रत्नागिरीत होणार आहे. त्यात दासबोधातील मॅनेजमेंटची सुत्रे कीर्तनाच्या माध्यमातून उलगडली जाणार आहेत.
या संघटनेचे ठाणे, डोंबिवली, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि नागपूर असे सात विभाग मिळून सुमारे ३२५ व्यावसायिकांचा समावेश आहे. विविध क्षेत्रातील हे व्यावसायिक एकमेकांना अनेक संदर्भ, संपर्क आणि व्यवसाय देतात. संघटनेतर्फे दर सहा महिन्यांनी सगळ्या विभागांची एकत्र केबीबीएफ ग्लोबल मीट आयोजित केली जाते. त्यामध्ये व्यवसायाच्या संधी, अडीअडचणी यावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. यशस्वी व्यावसायिक आपले अनुभव सादर करतात. या संघटनेच्या रत्नागिरी विभागाचे सदस्य होण्यासाठी नोंदणी सुरू केली आहे. नोंदणीची शेवटची तारीख ३० एप्रिल आहे. अधिकाधिक कऱ्हाडे ब्राह्मण व्यावसायिकांनी संघटनेचे सदस्य व्हावे, असे आवाहन सुहास ठाकूरदेसाई यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com