मालवणात १४ मे रोजी नाट्यगीत गायन स्पर्धा

मालवणात १४ मे रोजी नाट्यगीत गायन स्पर्धा

मालवणात १४ मे रोजी
नाट्यगीत गायन स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २५ : येथील अष्टपैलू कलानिकेतन या संस्थेतर्फे १४ मे रोजी नाटककार राम गणेश गडकरी यांच्या स्मरणार्थ भरड दत्तमंदिर येथे जिल्हास्तरीय सवेश, साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे.
याबाबतची माहिती संस्थाध्यक्ष भालचंद्र केळुसकर यांनी दिली. ही स्पर्धा बालगट (१२ वर्षांपर्यंत), युवा गट (१२ पुढील ते २० वर्षांपर्यंत) व २० वर्षांवरील खुला गट अशा तीन गटात घेतली जाणार आहे. बालगटासाठी अनुक्रमे ७००, ५००, ३०० रुपये व उत्तेजनार्थ तीन क्रमांकांना २०० रुपये व भेटवस्तू, युवा गटासाठी १२००, ८००, ५०० व चषक, उत्तेजनार्थ तीन क्रमांकांना ३०० रुपये, खुल्या गटासाठी २०००, १५००, १००० रुपये व चषक, उत्तेजनार्थ तीन क्रमांकांना ५०० रुपये अशी पारितोषिके दिली जातील.
स्पर्धेसाठी वेशभूषा व रंगभूषा स्पर्धकांनी स्वखर्चाने करायची आहे. आवश्यकता असल्यास नाव नोंदणीची मुदत संपण्यापूर्वी आगावू कल्पना दिल्यास रंग व वेशभूषाकारांशी संपर्क करवून देण्यात येईल. प्रत्येक गटात प्रथम नोंदणी करणाऱ्या १० स्पर्धकांना प्राधान्य दिले जाईल. स्पर्धा भरड दत्तमंदिर येथे सायंकाळी ६. ३० वाजता सुरू होईल. नावनोंदणीची अंतिम तारीख १० मे आहे. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी रत्नाकर सामंत यांच्याशी संपर्क साधावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com