सह्याद्रीच्या प्रदर्शनात ४० प्रयोगांचे सादरीकरण

सह्याद्रीच्या प्रदर्शनात ४० प्रयोगांचे सादरीकरण

७ (पान ३ साठी)

सह्याद्री प्रदर्शनात ४० प्रयोगांचे सादरीकरण

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ ः सावर्डेतील सह्याद्री पॉलिटेक्निक कॉलेजमधील एस. क्रीएटर्स या वार्षिक कार्यक्रमात विविध शाखांमधील ४० प्रयोग प्रदर्शनात मांडण्यात आले होते. त्यामध्ये संगणक, आयटी, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक विषयाशी प्रयोगांचा समावेश होता.
सावर्डेतील सह्याद्री पॉलिटेक्निकमधील या कार्यक्रमाचे उद्घाटन कलाक्षेत्रातील मयुरेश अभ्यंकर, उपेंद्र वेलणकर, दिग्दर्शक केतन केळकर आणि सह्याद्री शिक्षणसंस्थेचे सचिव महेश महाडिक यांच्या हस्ते झाले. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मंगेश भोसले, माने महाविद्यालयाचे शिंदे, रत्नागिरी येथील शासकीय पॉलिटेक्निकचे प्राध्यापक तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या प्रकल्पांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. या प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यात आले व त्यातून गुणदान करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे गौरवण्यात येणार आहे. एस. क्रीएटर्स हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समन्वयक एस. आर. देवरूखकर यांच्यासह प्रा. घोलपे, भोजने, कुंभार, पडवेकर, शिंदे, धामणस्कर, कदम, सुर्वे, पंडित, संसारे, साबळे व पांचाळ या सहकारी प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com