शिवाजीनगर बसस्थानकाची दैनावस्था संपणार

शिवाजीनगर बसस्थानकाची दैनावस्था संपणार

२४ ( पान ५ साठी, मेन )

- ratchl२५१.jpg-
२४M७९८५२
शिवाजीनगर बसस्थानक परिसरात सुरू असलेले काँक्रिटीकरणाचे काम.

शिवाजीनगर बसस्थानकाची दैनावस्था संपणार

काँक्रिटीकरण सुरू; तीन महिन्यात काम मार्गी लावण्याच्या हलचाली, तीन कोटी अपेक्षित खर्च
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण शिवाजीनगर बसस्थानकातील प्रवाशांची आता धुरळ्यापासून सुटका होणार आहे. महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळामार्फत या बसस्थानक परिसरात काँक्रिटीकरण व गटाराचे काम हाती घेण्यात आले आहे. येत्या तीन महिन्यात हे काम मार्गी लावण्याच्या हालचाली ठेकेदार कंपनीकडून सुरू आहेत. या कामांसाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
चिपळुणातील शिवाजीनगर बसस्थानक हे महामार्गावरील प्रमुख स्थानक आहे. या स्थानकात प्रवाशांची कायम वर्दळ असते. हा परिसर विस्तीर्ण आहे. येथे करण्यात आलेले खडीकरण पूर्णत: उखडले होते. त्यानंतर काही वर्षांनी शहरातील नद्यांमधून काढण्यात आलेला गाळ या स्थानकाच्या आवारात डम्प करण्यात आला होता. त्यातच आरटीओने पकडलेली वाहनेसुद्धा येथेच ठेवण्यात आली आहेत. पावसाळ्यात मातीच्या भरावामुळे येथे प्रचंड चिखलाचे साम्राज्य पसरले होते. त्यानंतर या परिसरात तात्पुरती उपाययोजना म्हणून खडीकरण करण्यात आले; मात्र ते सुद्धा टिकले नाही. अखेर एमआयडीसीमार्फत रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर व चिपळूण शिवाजीनगर बसस्थानक यांचे काँक्रिटीकरणासाठी सुमारे आठ कोटींची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. त्यापैकी चिपळूण येथील कामाचा ठेका ठाणे येथील एस. बी. खकाळ कन्स्ट्रक्शनला मिळाला. या ठेकेदाराने उपठेकेदार म्हणून चिपळुणातील क्लब टेंडर यांना काम दिले. त्यांच्यामार्फत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून काम सुरू झाले आहे.
-----
ठेकेदाराला सहा महिन्याची मुदत
बसस्थानक परिसरातील मातीच्या भरावाचे सपाटीकरण केले जात आहे. यासाठी ठेकेदार कंपनीने तीन जेसीबी, पाच ट्रॅक्टर, रोलर, गर्डर अशी यंत्रणा कार्यरत ठेवली असून जवळपास २० कामगार काम करत आहेत. मार्च महिन्यात कामाचा कार्यारंभ आदेश प्राप्त झाला होता तर ठेकेदाराला पावसाळा लक्षात घेऊन ६ महिन्याची मुदत देण्यात आली आहे.
-------
जप्त वाहनांचा अडथळा

उपप्रादेशिक परिवहन खात्याकडून विविध कारणांमुळे जप्त केलेली अनेक वाहने सध्या चिपळूण शिवाजीनगर बसस्थानक परिसरात सडत आहेत. या वाहनांना झाडाझुडपांनी वेढा घातला आहे. ही वाहने सध्या काँक्रिटीकरणासाठी अडथळा ठरत आहेत. त्यामुळे क्रेनच्या साहाय्याने ती तेथून हटवून बाजूला ठेवण्याचे काम सुरू झाले आहे. ही वाहने सडवण्यापेक्षा त्याचा लिलाव करून भंगारात का काढली गेली नाहीत, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com