प्रकल्पाच्या नावाखाली जमिनी हडपण्याचे प्रयत्न

प्रकल्पाच्या नावाखाली जमिनी हडपण्याचे प्रयत्न

७९७८४

पान ५

सिडकोचा ब्रह्मराक्षस का आणला
विनायक राऊत ः देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देण्याचे आव्हान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ ः कोकणात प्रकल्प आणण्याच्या नावाखाली जमिनी हडपण्याचा प्रयत्न केंद्रीय मंत्री नारायण राणे करत आहेत. कोकण सिडकोच्या घशात घालायचा आणि किनारपट्टीवरील लोकांना उद्ध्वस्त करायचं हा उद्देश आम्ही कदापी यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा देताना खासदार विनायक राऊत म्हणाले, ‘‘उद्या (ता. २६) राजापूर दौऱ्यावर येणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडकोचा ब्रह्मराक्षस कोकणात का आणला याचं उत्तर द्यावे.’’ इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ हरचेरी व नाचणे जिल्हा परिषद गटाचा मेळावा नाचणे येथे झाला.
राऊत म्हणाले, ‘‘आम्ही कधीच कुणाचा अवमान केलेला नाही किंवा असंस्कृत, असंसदीय शब्दात उद्धार केलेला नाही; परंतु भाजपचे उमेदवार नारायण राणे ते करत आहेत. स्वतः केंद्रात उद्योगखात्याशी निगडित असलेले खाते सांभाळताना रत्नागिरीत उद्योगधंदे बंद झाले आहेत. याबाबत ते जेव्हा सांगतात तेव्हा राणे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे बोट दाखवतात. भाजपने रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून ज्यांना उमेदवारी दिली त्यांच्यावर विविध आरोप आहेत. अशा व्यक्तीला प्रतिनिधी म्हणून लोकसभेत पाठवणार का, आमचा विरोध हा प्रकल्प आणायला नाहीये; परंतु कोकणाला उद्ध्वस्त करणारे प्रकल्प आणि अशा प्रकल्पांच्या नावाखाली जमिनी बळकवण्याला आमचा विरोध कायम राहील.’’
प्रकल्पाच्या नावाखाली तुम्ही जमिनी हडप करायच्या तर आम्ही विरोध करायचा की नाही, सी-वर्ड म्हणजे समुद्रातील विश्व आपण १३०५ एकर जमीन घेतली आणि १ हजार एकर स्वतःच्या मालकीच्या हॉटेलसाठी घेतली. मग याला विरोध करायला नको का, चिपी विमानतळासाठी हवी तेवढी जागा घ्या; पण विमानतळाच्या नावाखाली ९३७ एकर जमीन हडप करायला तुम्ही गेलात. त्या जमिनीवर नीलम हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी टाकली होती की नाही, मग याला विरोध करायचा की नाही सांगा, अशा प्रवृत्तीला विरोध करणारच, असे राऊत यांनी ठणकावून सांगतिले.


देव तुम्हाला माफ करो
कोकणच्या संस्कृतीचा ऱ्हास करणारे आणि विटंबना करून भरल्या व्यासपीठावरून महिलांसमोर शिवीगाळ करणारे, घाणेरड्या शिव्या तोंडात आणणारे नीलेश राणेंचं तुम्ही कौतुक करता! नारायणराव, देव तुम्हाला माफ करो आणि तुमचा पराभव लाखांच्या मताने करो. विनायक राऊत यांची नीलेश राणे मिमीक्री करतो म्हणून कौतुक करावसं वाटतं, कर बाबा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com