गुहागर - भाजपने नासवली देशाची संस्कृती

गुहागर - भाजपने नासवली देशाची संस्कृती

भाजपने नासवली देशाची संस्कृती
आमदार जाधव; विधानसभा क्षेत्रांचे सुक्ष्म नियोजन
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २५ : भाजप कार्यकर्ते तुमच्या मनात शिरण्यासाठी राममंदिराचा मुद्दा सांगतील. यांनी रामाच्या नावाने जमवलेला निधी पळवला, विटा चोरल्या, मंदिराचा कळस बांधलेला नसताना प्राणप्रतिष्ठा केली. रामाच्या मंदिरात राम, लक्ष्मण, सीता, हनुमंत असायला हवेत तिथे बाल्यावस्थेतील रामाची मूर्ती ठेवली. मोदीजी बालरामाला हात धरून मंदिरात नेत असल्याचे फोटो लावले. या गोष्टींना फसू नका. भाजपने देशाची संस्कृती नासवली आहे. देश वाचवण्यासाठी, संविधान टिकवण्यासाठी आणि पक्ष फोडणाऱ्या आणि चोरणाऱ्यांना तुरूंगात टाकण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी गीतेंच्या प्रचारसभेत केले.
गुहागर तालुक्यातील शृंगारतळीमधील भवानी सभागृहात अनंत गीतेंच्या प्रचाराची सभा झाली. या वेळी जाधव म्हणाले, जाणीवपूर्वक मी प्रचारापासून दूर असल्याचा, नाराज असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत; परंतु पक्षाने माझ्याकडे प्रचाराची जबाबदारी सोपवली आहे. राज्यातील विविध मतदार संघात प्रचाराच्या सभांना जात आहे; मात्र निवडणूक कोणतीही असो त्याचे काटेकोरपणे सुक्ष्म नियोजन आपण आजपर्यंत करत आलो आहोत. या वेळी प्रत्येक गावात किती मतदान झाले, प्रवाही मतदान किती आहे, आपले मतदान कसे वाढेल, याचा विचार गावागावातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन केला आहे. मुस्लिम समाजाची ९०-९५ टक्के मते मिळावीत म्हणून मुस्लिम कार्यकर्त्यांची स्वतंत्र कमिटी, बौद्ध समाजाची कमिटी, गावाची कमिटी, प्रत्येक गावावर लक्ष ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांची स्वतंत्र कमिटी असे नियोजन करून काम सुरू आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील प्रमुख कार्यकर्त्यांद्वारे हे नियोजन प्रत्यक्षात अंमलात आणले जात आहे. त्यांच्याकडून मला अहवाल मिळतो. अडचणी सोडवतो. निवडणुकीच्या कामात मीपणा ठेवत नाही, हे सारे तुम्हा सर्वांना माहिती आहे. विधानसभा क्षेत्रात एकही गाव असे नाही जिथे मी निधी दिला नाही. माझे काम मी चोख केले आहे. आता त्यांचे मतदानातून प्रत्यंतर देण्याचे काम तुमचे नाही का? आजच्या निवडणुकीत संभ्रमाचे वातावरण तयार केले जात आहे. अशावेळी महाविकास आघाडीची निशाणी मशाल आहे, हे मतदारांच्या मनावर ठसविण्याचे काम सर्वांनी करावे, असे आवाहन या वेळी आमदार जाधव यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com