रखडलेले मानधन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यात

रखडलेले मानधन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यात

४० ( पान ३ साठी )

मानधन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यात

चिपळूण, ता. २५ ः गेले अनेक दिवस रखडलेले मार्च महिन्याचे मानधन अखेर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. ते व्हावे यासाठी कर्मचारी संघटनेने काही दिवसांपूर्वी दिलेल्या निवेदनाची शासनाने दखल घेत ही कार्यवाही केली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याचे मानधन वेळेत देण्याची मागणी होत आहे.
गावागावातील, वाडीवस्त्यांवर असलेल्या अंगणवाडी केंद्रात बालकांवर संस्कार करण्यासह गरोदर, स्तनदा माता व किशोरवयीन मुलींच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम अंगणवाडी सेविका व मदतनीस करत असतात. त्यातच शासन या कर्मचाऱ्यांवर विविध कामे लादते. निवडणूक प्रशिक्षण, आरोग्याची कामे सोपवली जातात; मात्र त्यांचे मानधन वेळेत देण्याबाबत कायमच उदासीनता दाखवली जाते. एप्रिल महिना संपत आला तरी मार्च महिन्याचे मानधन मिळाले नव्हते. त्यामुळे कर्मचारी संघटनेने काही दिवसांपूर्वी शासनाला निवेदन देऊन तत्काळ मानधन जमा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सोमवारी मानधन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले. यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला, असे असले तरी पावसाळा काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे इतरांप्रमाणे या कर्मचाऱ्यांनाही पावसाळी तयारी करायची आहे. त्यातच विविध सण, घरगुती कार्यक्रम याचा विचार करता खर्च येतो. त्यामुळे एप्रिल महिन्याचे मानधन मे महिन्याच्या ५ तारखेपर्यंत खात्यात जमा करण्याची मागणी कर्मचाऱ्यांच्यावतीने करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com