कोकण रेल्वे मार्गावर जादा रेल्वे धावणार

कोकण रेल्वे मार्गावर जादा रेल्वे धावणार

कोकण रेल्वे मार्गावर
जादा रेल्वे धावणार
कणकवली,ता. २५ ः कोकण रेल्वे मार्गावारील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक (एवटीटी) ते थिविम ही विशेष रेल्वे गाडी धावणार आहे.
गाडी क्र. ०१०१७ एलटीटी ते थिविम स्पेशल लोकमान्य टिळक (एलटीटी) येथून २६ एप्रिल ते ४ जूनपर्यंत दर शुक्रवार, रविवार आणि मंगळवारी रात्री १०१५ वाजता सुटेल. परतीसाठी ही गाडी क्र. ०१०१८ थिविम ते लोकमान्य टिळक (एलटीटी) थिविम येथून २७ अप्रिल ते ६ जूनपर्यंत दर शनिवार, सोमवार आणि बुधवारी सायंकाळी ४.३५ वाजता सुटेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकावर थांबेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com