संपत्ती लुबाडण्याचा काँग्रेसचा कट मोदींनी केला उघड

संपत्ती लुबाडण्याचा काँग्रेसचा कट मोदींनी केला उघड

४५ पान ५ साठी

संपत्ती लुबाडण्याचा काँग्रेसचा कट उघड

राजेश सावंत ; मोदींमुळे हादरून गेले आहेत

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : देशाची सामाजिक घडी पूर्णपणे मोडून केवळ अल्पसंख्यांकांचे लांगूलचालनाचे करण्याचे घातक राजकारण उघडे पडल्यामुळे आता काँग्रेस पक्ष हादरून गेला आहे. संपत्तीचे फेरवाटप करण्याचा माओवादी कट काँग्रेसने रचल्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केले.
देशातील साधनसंपत्तीवर पहिला अधिकार अल्पसंख्यांकांचा आहे, असा दावा २००६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी केला होता. आता काँग्रेस सत्तेवर आल्यास तो प्रत्यक्षात आणला जाईल आणि गरिबांकडील संपत्ती हिरावून घेतली जाईल, असा इशाराही सावंत यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिला.
ते म्हणाले, राजस्थानमधील बसवारा येथील जाहीर सभेत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसचा हा कट उघड केला. त्यामुळे काँग्रेस पक्ष गोंधळला आहे. काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळेच देशातील दलित, मागासवर्गीय, ओबीसी समाज विकासापासून वंचित राहिला असून, केवळ अल्पसंख्यांकांची मते मिळवण्यासाठी काँग्रेसने या समाजाची कायम उपेक्षा केली. या उलट, देशाच्या विकासाची फळे समाजाच्या प्रत्येक स्तरावरील अखेरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजेत, सरकारच्या प्रत्येक योजनेचा संपूर्ण लाभ खऱ्या लाभार्थीला मिळाला पाहिजे आणि प्रत्येक कुटुंबाला सक्षमतेच्या समान संधी मिळाल्या पाहिजेत यावर मोदी सरकारने नेहमी भर दिला आहे. अंत्योदयाच्या नीतीवरच पक्षाची वाटचाल सुरू असल्याने मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत आखलेल्या प्रत्येक योजनेचे लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले आहेत.

चौकट १
काँग्रेसचा राजकारणाला विरोध
गरिबांच्याही संपत्तीवर डोळा असलेली व संपत्ती काढून घेऊन अन्य समाजात तिचे वाटप करण्याचा कट आखणारी काँग्रेस व प्रत्येक समाजघटकास संपत्ती निर्माण करण्याच्या संधी देणारी भाजप असा हा सामना आहे, असेही सावंत म्हणाले. अल्पसंख्यांकाचे लांगूलचालन करून निवडणुका जिंकण्याचे काँग्रेसचे राजकारण १९६० पासून सुरू आहे आणि भाजप सातत्याने याविरूद्ध संघर्ष करत आहे, असे सावंत यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com