क्राईम

क्राईम

४३ ( पान ३ साठी )

दारू विक्री प्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी ः तालुक्यातील वाटद-सुतारवाडी येथील जंगलमय भागात विनापरवाना हातभट्टीची दारू विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ३५० रुपयांची पाच लिटर दारू पोलिसांनी जप्त केली. जयगड पोलिस ठाण्यात संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (ता. २४) दुपारी येथील जंगलमय भागातील एका झाडाखाली निदर्शनास आली.
-----------
तरुण झाडावरून पडून जखमी

रत्नागिरी ः तालुक्यातील गोळप-धोपटवाडी येथे हापूस आंबा कलमाचे आंबे काढत असताना नेपाळी झाडावरून पडला. जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी पावस येथील आरोग्यकेंद्रात दाखल केले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सागर रामबहाद्दूर रसायली (वय ३४, रा. धोपटवाडी-गोळप, मुळ ः नेपाळ ) असे जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरूवारी (ता. २५) सकाळी नऊच्या सुमारास घडली. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर उपाचार सुरू आहे. या प्रकरणी रुग्णालयाच्या पोलिसचौकीत नोंद करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com