तर पक्षासाठी कोरड्या विहिरीतही उडी मारेन

तर पक्षासाठी कोरड्या विहिरीतही उडी मारेन

५१ ( पान ३ )
-----------
तर पक्षासाठी कोरड्या विहिरीतही उडी

वैभव खेडेकर ; राज यांच्या आदेशानुसारच वाटचाल

सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २५ : राजकारणात कोणी कोणाचा मित्रही नसतो अन् शत्रूही नसतो. यामुळे भविष्यात सगळ्या बाबी योगायोगाने जुळून येतील, असा आशावाद व्यक्त करताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आदेश दिल्यास कोरड्या विहिरीत उडी मारण्याचीही आपली तयारी आहे, असे स्पष्टीकरण मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी दिले. राज यांच्या आदेशानुसारच पुढील राजकीय वाटचाल चालणार असल्याचेही स्पष्ट केले.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर उत्तर रत्नागिरीतील पदाधिकाऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. ज्यांनी खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात डांबले, कार्यकर्ते फोडून पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांच्या व्यवसायावर गदा आणली या आणि अशा प्रश्नांचा भडीमार करत अशा परिस्थितीत महायुती समवेत राजकीय वाटचाल करायची कशी, अशा व्यथा कार्यकर्त्यांनी दस्तुरखुद्द राज ठाकरे यांच्यासमोर मांडल्या होत्या. शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना डोस पाजल्यानंतर मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे व भाजपचे रत्नागिरीतील उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले होते.
------

एकमेव भ्रष्टाचारी नगराध्यक्ष
रामदास कदम यांनी वैभव खेडेकर टीकास्त्र सोडत महाराष्ट्रातील एकमेव भ्रष्टाचारी नगराध्यक्ष असल्याची जहरी टीका त्यांच्यावर केली होती. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कदम महायुतीचे नेते असून महायुतीसाठी पोषक वातावरणही आहे. यामुळे यात मिठाचा खडा होवू इच्छित नाही. माझ्याबाबत ते बोलले त्याची दखल दस्तुरखुद्द राज ठाकरे यांनी घेतली आहे, असेही स्पष्ट केले.
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com