मुलांच्या आचरणात संस्कारांचे प्रतिबिंब

मुलांच्या आचरणात संस्कारांचे प्रतिबिंब

swt2522.jpg
79873
कासार्डे : बालसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना रवींद्र पाताडे. व्यासपीठावर सहदेव मस्के, प्रकाश तिर्लोटकर, रवींद्र पाताडे, मुख्याध्यापक कुचेकर व अन्य. (छायाचित्र ः एन. पावसकर)

मुलांच्या आचरणात संस्कारांचे प्रतिबिंब
रवींद्र पाताडे ः कासार्डेत बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २५ ः मुले हीच आपली खरी संपत्ती आहे. बालवयात मुलांना योग्य मार्गदर्शन आणि योग्य संस्कार मिळणे गरजेचे आहे. लहान मुले ही मातीच्या गोळ्याप्रमाणे जसे वळण लावू, तशाप्रकारे घडत जातात. कोणतेही चांगले विचार आणि संस्कारांचे प्रतिबिंब मुलांच्या बोलण्या-वागण्यातून दिसून येतात. म्हणून भावी पिढी संस्कारक्षम होण्यासाठी अशी बालसंस्कार शिबिरे आयोजित होणे काळाची गरज बनली आहेत, असे प्रतिपादन कासार्डे विकास मंडळ मुंबईचे पदाधिकारी रवींद्र पाताडे यांनी केले.
कासार्डे विकास मंडळ, मुंबई संचलित कासार्डे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित केलेल्या पाच दिवसीय मोफत बालसंस्कार शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी सैनिक तथा संस्था पदाधिकारी रवींद्र पाताडे, सहदेव मस्के, प्रकाश तिर्लोटकर, मुख्याध्यापक एन. सी. कुचेकर, पर्यवेक्षक एस. डी. भोसले आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
प्रास्ताविक एन. सी. कुचेकर यांनी केले. मुलांच्या कलागुणांना वाव देणारे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भर टाकणारे हे शिबिर असल्याचे त्यांनी सांगितले. मोबाईलपासून दूर राहण्यासाठी बालसंस्कार शिबिरे महत्त्वाची असल्याचे प्रकाश तिर्लोटकर यांनी सांगितले. या शिबिरात दशक्रोशीतील ६ ते १३ वयोगटातील ७० हून अधिक मुलांनी सहभाग घेतला आहे. दरम्यान, या शिबिरात मुलांना आनंददायी अनुभव आणि व्यक्तिमत्वात भर टाकणारे शिक्षण मिळावे, यासाठी विविध मनोरंजक खेळ, विस्मृतीत गेलेले बालपणीचे खेळ, आईस ब्रेकिंग, खेळातून विज्ञान, ज्युदो कराटे, थ्रीडी शो, योगासने, हसत खेळत इंग्रजी, मनोरंजनात्मक प्रयोग, रंगावली, कलावर्ग, विविध गुणदर्शन, वैदिक गणित, स्टेम लर्निंग यासारख्या
अनेक कलागुणांचे तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली सलग पाच दिवस अभ्यासाव्यतिरिक्त शिक्षण दिले जाणार आहे.
सूत्रसंचालन प्रा. आर. व्ही. राऊळ यांनी केले. आभार पर्यवेक्षक एस. डी. भोसले यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com