क्राइम

क्राइम

. ५० ( पान ५ )
-----------
खेड, लोटे येथील
जुगार अड्ड्यांवर छापा

खेड ः येथील पोलिसानी खेड शहरातील तीन बत्ती नाका व लोटे येथील एका कंपनीनजीक शुभ अंकावर पैसे लावून जुगार खेळणाऱ्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. यामध्ये दोघांकडून रोकड जप्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २४ एप्रिल रोजी करण्यात आली. तीन बत्ती नाका, हुनमान मंदीराच्या समोरील गल्लीमध्ये, महेंद्र विठ्ठल जाधव (वय - ६२ वर्षे,रा. शिरळ ता.चिपळूण) हा शुभ अंकावर पैसे लावुन मटका- जुगाराचा घेत असताना रंगेहाथ मिळुन त्याच्या कडून १ हजार १४० रोकड जप्त करण्यात आली. दरम्यान लोटे एम.आय.डी.सी येथील मोकळ्या जागेत संदीप मधुकर जाधव ( वय ४० वर्षे रा. खेंड कागणेवाडी ता.चिपळुण) हा देखील उभा राहुन मटका जुगार खेळत असताना आढळला. त्याच्याकडून १ हजार ७६३ रु रोकड जप्त करण्यात आली.
--

rat२५p२८.jpg -
P२४M७९८६५
खेड - दापोली मार्गावरील अपघातग्रस्त वाहने.

खेड दापोली मार्गावर तिहेरी अपघात

खेड ः खेड दापोली मार्गावर सुर्वे इंजीनियरिंगसमोर आज रिक्षा टेम्पो व दुचाकी यांच्यामध्ये अपघात झाला .या अपघातात जीवितहानी टळली मात्र रिक्षाचा चुराडा झाला. घटनास्थळी खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या प्रसंगावधानामूळे अपघातग्रस्तांना तत्काळ उपचार मिळण्यास मदत झाली.गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास खेड वरून दापोली येथे जाणाऱ्या एका रिक्षाचा सुर्वे इंजिनिअरींग येथे भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये २ महिला, २ लहान मुली, १ पुरूषासोबत चालक आणि २ महिन्याच्या लहान मुलीचा देखील समावेश होता. खेडेकर यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना स्वतःच्या गाडीतून भरणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
--
फसवणुकीतील संशयित जामिन

खेड ः तालुक्यातील बचत गटातील महिलांना शासनामार्फत सवलतीच्या दरात शिलाई मशिनसह घरकुल देण्याचे आमिष दाखवत २३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गजाआड करण्यात आलेल्या बबन मारुती मोहिते याची न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली. बचत गटाच्या महिलांना शासनाकडून महागडी हातशिलाई मशिन, घरकुल, घरघंटी व गोठा सवलतीच्या दरात देण्याचे आमिष दाखवत बबन मोहिते आणि त्याच्या साथिदाराने तब्बल ९३८ महिलांची २३ लाख रुपयांची फसवणूक करत पोबारा केला होता. यातील मुख्य सूत्रधार संदीप डोंगरे याच्या यापूर्वीच शिताफीने मुसक्या आवळल्या होत्या.
--
बंदुकीसह काडतुसे बाळगणाऱ्यांना जामीन

खेड ः विनापरवाना दोन बॅरल बंदुकीसह १२ जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने अटक केलेल्या त्या दोघांनान्यायालयासमोर हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. बोरज येथील अनिल भिकू गुहागरकर (५३बोरज- शिवफाटा शेवरवाडी) याच्या ताब्यातील २७ हजार ५०० रुपये किंमतीची बॅरल बंदूक व आठ जिवंत काडतुसे तर याच गावातील राजेश गजानन साळवी याच्याकडेही २६ हजार २०० किंमतीची विनापरवाना सिंगल बॅरल बंदूक, चार जिवंत काडतुसे जप्त केली होती.
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com