विवाहितेस धमकीप्रकरणी 
पतीसह सहा जणांवर गुन्हा

विवाहितेस धमकीप्रकरणी पतीसह सहा जणांवर गुन्हा

विवाहितेस धमकीप्रकरणी
पतीसह सहा जणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
कणकवली,ता. २९ ः पत्नीला शिवीगाळ करून मारण्याची धमकी, घरात येण्यापासून अटकाव केल्याप्रकरणी शहरातील ढालकाठी येथील पतीसह चुलत सासू व सासऱ्याविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी नीता प्रणाम कामत (वय ३८) यांनी फिर्याद दिली.
प्रणाम अरविंद कामत (वय ४८), सासू गितांजली प्रफुल्ल कामत (वय ५८), क्षमा सुजण कामत (वय ५६), पूजा प्रकाश कामत (वय ६२), प्रकाश गोविंद कामत (वय ७०), सुजन गोविंद कामत (वय ६३) अशी संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निता यांनी फिर्यादीत म्हटले आहे, नीता व त्यांचा मुलगा प्रेषित कामत कणकवली शहरातील सामाईक घरात राहतात. रविवारी (ता.२८) सकाळी नऊच्या सुमारास नीता जेवण करत असताना त्यांची चुलत सासू गितांजली कामत, क्षमा कामत, पूजा कामत, चुलत सासरे प्रकाश कामत, सुजन कामत यांनी ‘‘तू इथे राहू नको, घर रिकामे कर, घरात तू रहायचे नाही’’, अशी धमकी दिली. याबाबत निता पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर त्या पुन्हा घरी परतल्या, तेव्हा त्यांचा पती प्रणाम कामत याने ‘‘माझ्या घरात तू का आलीस? तुझे हातपाय तोडून टाकीन’’, अशी धमकी देत त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर घराच्या खिडक्या बंद करून व दरवाजाला नवीन कुलूप लावून नीता यांना घरात प्रवेश करण्यास अटकाव केला. त्यांचे चुलत सासरे सुजन कामत आणि प्रकाश कामत यांनी घराच्या दरवाज्यासमोर चिऱ्याचे थर रचून घराची वाट बंद केली. याप्रकरणी निता यांनी कणकवली पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पतीसह चुलत सासू व सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक तपास कणकवली पोलिस करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com