रत्नागिरी - कोकणच्या विकासासाठी प्रयत्नशील

रत्नागिरी - कोकणच्या विकासासाठी प्रयत्नशील

कोकणच्या विकासासाठी
प्रयत्नशील ः राऊत

हातखंबा येथे जि. प. गटाचा मेळावा

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ ः जिथे गेली ७५ वर्षे साधे दळणवळण करण्यासाठी रस्त्याची व्यवस्था नव्हती. तिथे माझ्या कार्यकाळात रस्ता बनवता आला, हे मी माझे भाग्य समजतो. येणाऱ्या पाच वर्षांच्या कालावधीत प्रधानमंत्री स्वदेस दर्शनच्या दुसऱ्या टप्प्यात केवळ सिंधुदुर्ग नाही तर रत्नागिरीसह संपूर्ण कोकणचा पर्यटनदृष्ट्या शाश्वत विकास करणार आहे, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी केले.
करबुडे व हातखंबा जिल्हा परिषद गटाचा हातखंबा सिद्धगिरी हॉल येथे आयोजित संयुक्त मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी मतदार संघ संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, माजी जिल्हाप्रमुख उदय बने, तालुकाध्यक्ष प्रदीप साळवी, जिल्हा समन्वयक संजय पुनस्कर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, प्रमोद शेरे, रवींद्र महाकाळ, दुर्गेश साळवी, काँग्रेसच्या विधी व न्याय विभागाच्या अॅड. अश्विनी आगाशे, दीपक राऊत, भाई तारवे, साक्षी रावणंग, ममता जोशी, अप्पा धनावडे, विनोद शितप, परशुराम कदम, प्रदीप घडशी आदी इंडिया आघाडीचे मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या मेळाव्यात राऊत यांनी राणेंना प्रत्युत्तर केले. ते म्हणाले, जे राणे आज सांगत आहेत की, मी जर खासदार झालो तर रत्नागिरीचा विकास कसा करायचा हे इतरांना शिकवेन; परंतु हे सांगत असताना ते हे विसरतात की, गेली साडेचार वर्षे ते देशाचे कॅबिनेट मंत्री होते. हजारो कोटींचा निधी असलेल्या खात्याचा पदभार त्यांच्याकडे असतो. त्यांनी रत्नागिरीचा विकास का केला नाही? विकास करण्याची त्यांना संधी होती; मात्र त्यांना विकास शिकवण्याची आवश्यकता आहे. या मेळाव्याला अनेक मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. दोन्ही जिल्हा परिषद गटामधून मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रसंगी एकजुटीने सर्वांनी खासदार राऊत यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचा जयघोष केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com