दाणोली वाचन मंदिरच्या
अध्यक्षपदी भरत गावडे

दाणोली वाचन मंदिरच्या अध्यक्षपदी भरत गावडे

80499
भरत गावडे

दाणोली वाचन मंदिरच्या
अध्यक्षपदी भरत गावडे

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २९ ः दाणोली येथील समर्थ साटम महाराज वाचन मंदिरच्या अध्यक्षपदी भरत गावडे, सचिवपदी डॉ. लवू सावंत यांची निवड करण्यात आली. वाचनालयाची २०२४ ते २०२९ या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली.
या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी भास्कर परब, सहसचिव गजानन गावडे, सदस्यपदी गिरीधर चव्हाण, जेरॉन लॉड्रीक, नामदेव राऊळ, सुरेश आडेलकर, कृष्णाजी परब, शैलेश मेथर, राजाराम पाटील, आनंद राऊळ, सखाराम तिळवे, रश्मी सावंत, रिया सांगेलकर आदी पंधरा सदस्यांची निवड करण्यात आली. दरम्यान, वाचनालयातर्फे प्रौढ वाचकांसाठी मेळावे घेऊन घरपोच पुस्तके देण्याची योजना राबविली जाणार आहे. तसेच आदर्श वाचक गौरव, ‘चला जाऊया ग्रंथालयात’, ‘मी वाचले, तुम्ही वाचा’, असे उपक्रम हाती घेतले आहेत, अशी माहिती अध्यक्ष गावडे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com