''मविआ''तर्फे डिगस परिसरात राऊत यांच्या प्रचारास प्रारंभ

''मविआ''तर्फे डिगस परिसरात राऊत यांच्या प्रचारास प्रारंभ

swt295.jpg
80502
डिगसः येथे खासदार राऊत यांच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत व अन्य.

‘मविआ’तर्फे डिगस परिसरात
राऊत यांच्या प्रचारास प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २९ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव ठाकरे तथा इंडिया-महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ डिगस पंचायत समिती मतदार संघात पदाधिकारी व कार्यकर्ते घराघरांत पोचून प्रचार पत्रके वाटत आहेत. गेल्या दहा वर्षांतील खासदार राऊत यांच्या कार्याचा लेखाजोगा घराघरांत पोहोचविला जात आहे. प्रत्येक मतदाराच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधण्यावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भर दिला आहे.
ठाकरे शिवसेनेकडून डिगस पंचायत समिती मतदार संघातील डिगस, पणदूर, हुमरमळा, अणाव या गावांत राऊत यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. प्रचाराची मशाल हातात घेऊन कार्यकर्ते घरोघरी जाऊन पत्रके वाटत आहेत. मतदारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. डिगस येथे नुकताच प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर गावात प्रचाराची एक फेरी पूर्ण करण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, उपसरपंच मनोज पाताडे, माजी सरपंच राजा पवार, बाळा पवार, सतीश सुर्वे, आबा पवार, दाजी पवार, प्रशांत जाधव, दशरथ गोसावी, मंदार कोठावळे, रुपेश पवार, बाळा सावंत, आनंद सावंत, साक्षी सावंत, राजू गुरव, राजश्री गुरव, दीपक चोरगे, उदय धावले, रुपेश पवार, संतोष पवार, अक्षय सुर्वे, संजय तावडे, जान्हवी पवार, महेश पवार, बिट्टू पवार, भास्कर पवार, प्रभाकर झोरे, संतोष गोसावी, बाळा शिरोडकर उपस्थित होते. हुमरमळा येथे माजी उपसभापती जयभारत पालव, अणाव सरपंच लिलाधर अणावकर प्रचारात सहभागी झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com