नोटरीने विश्वासाहर्ता जपली पाहिजे

नोटरीने विश्वासाहर्ता जपली पाहिजे

१६ (टुडे ३ साठी, मेन)

rat२९p१२.jpg-
P२४M८०४९४
रत्नागिरी : नोटरीज असोसिएशनच्या सेमिनारप्रसंगी उपस्थित प्रधान जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी, विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एन. जे. गोसावी यांच्यासमवेत श्रीनिवास तर्टे, अध्यक्ष अॅड. विलास पाटणे, अॅड. अमोल शिंदे आदी.

नोटरींनी विश्वासाहर्ता जपली पाहिजे

प्रधान जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी ः रत्नागिरीत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ : प्रामाणिकपणे काम करून जनतेची सेवा करता येते तसेच नोटरींनी आपली विश्वासाहर्ता जपली पाहिजे, असे आवाहन प्रधान जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांनी केले.
महाराष्ट्र नोटरीज् असोसिएशनतर्फे कुवारबाव येथील खासगी हॉटेलमध्ये आयोजित एकदिवसीय नोटरी सेमिनारमध्ये ते बोलत होते. या सेमिनारला विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एन. जे. गोसावी, नोटरीज् असोसिएशन अध्यक्ष श्रीनिवास तर्टे, रत्नागिरी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे, नोटरीज् असोसिएशन सचिव अॅड. अशोक वायदंडे, नोटरीज् असोसिएशन रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. अमोल शिंदे, सचिव अॅड. राजेश गुरव, जिल्हा खजिनदार अॅड. रत्नदीप चाचले, नोटरीज् असोसिएशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष अॅड. श्रीनिवास गवस, महाराष्ट्रामधून विविध ठिकाणाहून आलेले नोटरी अॅडव्होकेटस्, केंद्र सरकारने नियुक्त केलेले नवीन नोटरी पब्लिक अॅडव्होकेटस् उपस्थित होते.
प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी मार्गदर्शन केले व नोटरी म्हणून काम पाहताना कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता नोटरी अॅक्टमधील तरतुदीनुसार काम करण्याविषयी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नोटरीज् असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास तर्टे यांनी केले. नवनियुक्त नोटरींपैकी ॲड. योगेंद्र गुरव व अॅड. दीपा रसाळ यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. अॅड. अमोल शिंदे यांनी नवनियुक्त नोटरी यांना मार्गदर्शन केले. जिल्हा विधी प्राधिकरणाचे अध्यक्ष एन. जे. गोसावी यांनी देखील नोटरी म्हणून काम करताना घ्यावयाच्या काळजीविषयी मार्गदर्शन केले.
------

चौकट १

न्या. रामशास्त्रींचे अपूर्व धैर्य

ज्यांनी आपल्याला नेमले त्यांनाच देहांत शिक्षा देताना न्या. रामशास्त्री यांनी अपूर्व धैर्य दाखवले. मार्क ट्वेन म्हणतो, ‘धैर्य म्हणजे भीतीचा अभाव नसतो तर धैर्य म्हणजे भीतीवर मिळवलेला निर्विवाद विजय असतो, हे धैर्य रामशास्त्री यांनी दाखविले. नोटरी म्हणून सेवा बजावताना ‘यतो धर्मस्ततो जया’ या न्यायाने विश्वासाहर्ता जपली पाहिजे, असे प्रतिपादन रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com