खेड - भरणेत पथदीपांसाठी अधिकाऱ्यांकडून पाहणी

खेड - भरणेत पथदीपांसाठी अधिकाऱ्यांकडून पाहणी

भरणेत पथदीपांसाठी
अधिकाऱ्यांकडून पाहणी
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २९ : मुंबई- गोवा महामार्गावर भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणी उड्डाणपुलावरील बंद असलेल्या पथदीपांमुळे वाहनचालकांची फसगत होत आहे. परिस्थितीची माहिती घेऊन राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांनी घेऊन प्रत्यक्षात पथदीपांची पाहणी केली. महावितरणाकडे तातडीने पत्रव्यवहार करून येत्या आठवडाभरातच सर्व पथदीप कार्यान्वित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
भरणे येथील मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणातील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे; मात्र या ठिकाणी अनेक समस्या आहेत. उड्डाणपुलाच्या मध्यात दोन्ही बाजूला उभारण्यात आलेले सर्वच पथदीप बंद आहेत. नव्या जगबुडी पुलावर अपघातांची मालिका सुरू असल्याने पोलिसांची डोकेदुखी कायम आहे. त्यात बंद पथदीपांमुळे वाहनचालकांच्या होणाऱ्या गैरसोयीमुळे मनस्ताप वाढला आहे.
उड्डाणपुलावर दिशादर्शक फलकच उभे केलेले नाहीत. या फलकांअभावी ये-जा करणारे वाहनचालक बुचकळ्यातच पडत आहेत. पथदीप कार्यान्वित करण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांनी आवाज उठवला होता. त्याची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांनी बंद पथदीपांची पाहणी केली. पथदीप कार्यान्वित करण्यासाठी तातडीने महावितरणकडे पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. येत्या आठवडाभरात हे पथदीप सुरू होतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com