भरपाईपासून दापोलीतील २४७ शेतकरी वंचित

भरपाईपासून दापोलीतील २४७ शेतकरी वंचित

५ (टूडे १ साठी)

भरपाईपासून दापोलीतील २४७ शेतकरी वंचित

ई-केवायसीचा अभाव; केवळ चार शेतकऱ्यांकडून कार्यवाही

सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. २९ ः नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने दापोली तालुक्यातील २४७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. याबाबतचे पंचनामेही झाले होते; परंतु सहा महिन्यांपासून ई-केवायसी करण्यात आलेली नसल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा झालेली नाही. त्यातील केवळ चार शेतकऱ्यांनी ई-केवायसी केल्याचे दापोली कृषी विभाग, तहसीलदार कार्यालयाकडून सांगण्यात आले.
ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये भातशेती, नाचणी या पिकांची कापणी सुरू असते. त्या वेळी नोव्हेंबर २०२३ मध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दापोली तालुक्यातील २४७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तहसीलदारांच्या सूचनेनंतर कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात आले. पंचनामे पूर्ण करू ऑनलाईन कामेदेखील पूर्ण झाली; परंतु सहा महिने उलटले तरीही नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत दापोली तहसीलदार व कृषी विभागाशी संपर्क साधला असता शासनाच्या नियमानुसार नुकसानग्रस्तांनी महाई-सेवा केंद्रात जाऊन ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे. ई-केवायसी झाल्यानंतर रक्कम बँकखात्यात जमा होणार असल्याचे सांगण्यात आले. २४७ नुकसानग्रस्तांपैकी ४ जणांनीच ई-केवायसी केली असून, उर्वरित शेतकऱ्यांनी ती करून घ्यावी असे आवाहन दापोली तालुका कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com