कचरा संकलनाची माहिती मिळणार एका क्लिकवर

कचरा संकलनाची माहिती मिळणार एका क्लिकवर

rat२९p२२.jpg
८०५२९
राजापूर नगर पालिका

कचरा संकलनाची माहिती मिळणार एका क्लिकवर
राजापूर पालिका ; मालमत्तांसह डस्टबिनवर क्युआर कोड
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २९ः येथील नगरपालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील कचरा संकलनाची व्यवस्थित पारदर्शकता आणली आहे. त्यामध्ये घराघरातून कचरा संकलनासाठी क्युआर कोडपद्धतीचा अवलंब केला आहे. त्यामुळे कचरागाडी घरापर्यंत येत नाही, नियमित कचरा उचलला जात नाही याची माहिती प्रशासनाला एका क्लिकवर मिळणार आहे.
कचरा संकलनासाठी उपयुक्त ठरणार क्युआर कोड शहरातील मालमत्तांवर लावण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये सुमारे ३ हजार ५०० मालमत्तांपैकी २ हजार ३०० मालमत्तांवर क्युआर कोड बसवला आहे, असे नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. शहरातील कचऱ्याचे संकलन करण्यासाठी घंटागाडी आणि सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तरीही अनेक भागात नियमित कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारी लोकांकडून येत आहेत. या तक्रारींचे तत्काळ निवारण व्हावे, परिसराची स्वच्छता व्हावी आणि कचरा संकलनामध्ये पारदर्शकता अन् व्यापकता यावी म्हणून शासनातर्फे स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गंत आयसीटी बेस प्रणाली कार्यरत केली आहे. ही प्रणाली नगरपालिकेने अवलंबली आहे. त्यानुसार शहरातील मालमत्ता आणि ओला अन् सुका कचरा साठवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डस्टबिनवर क्युआर कोड बसवला आहे. कचरा संकलन कर्मचाऱ्यांनी कचरा घेतल्यानंतर त्या त्या ठिकाणी बसवलेला क्युआर कोड मोबाईलद्वारे स्कॅन केला जाईल. या स्कॅनिंगमुळे त्या त्या भागातील कचरा गोळा केला की नाही याची माहिती प्रशासनाला एका क्लिकवर मिळणार आहे.

चौकट
दृष्टिक्षेपात राजापूर
लोकसंख्याः सुमारे दहा हजार
कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीः ३
आरोग्य विभागातील कर्मचारीः ४७
नियमित संकलित होणारा कचराः ३.५ टन (१ टन सुका, २.५ टन ओला)
क्युआरकोड बसवायच्या मालमत्ताः ३२६८
क्युआरकोड बसवलेल्या मालमत्ताः २३४१

चौकट
* क्युआर कोडचे असेही फायदेः
- कचरा उचलला गेल्याची नोंद होण्यास मदत
- कचर्‍यासंबंधित लोकांच्या तक्रारींवर बसणार अंकुश
- कचरा संकलनामध्ये येणार अधिक पारदर्शकता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com