सती विद्यालयात शिबिर

सती विद्यालयात शिबिर

सती विद्यालयात
बालसंस्कार शिबिर

चिपळूण ः सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या सती चिंचघरी येथील प्राथमिक शाळेत दरवर्षी वार्षिक परीक्षा पूर्ण झाल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बालसंस्कार शिबिर नियोजनपूर्वक उत्साहात घेतले जाते. यंदा १५ ते २० एप्रिल या कालावधीत शाळेत संस्कार शिबिर घेण्यात आले. शिबिरासाठी सर्वसाधारणपणे नियमितपणे २५० विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. या शिबिरात बोधकथा, कलाशिक्षक टी. एस. पाटील यांचा बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम, स्वरा यादव यांचे गायन तर अक्षद परब यांचे तबलावादन व वेणू महाडीक यांनी हर्मोनियम तसेच सावनी पावसकरने नृत्याची प्रात्यक्षिके दाखवली. प्रेमजीभाई प्राथमिक विद्यालयाचे आशिष मांडवकर यांनी विविध संस्कार कथा या संबंधी उत्तम कथाकथन केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून रांगोळी काढणे, मेहेंदी व नेलआर्टचे प्रात्याक्षिक करून घेतले. शिबिरांतर्गत सहल पेढांबे येथे डीस्टार वॉटरपार्क येथे नेण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com