हडी येथे शुक्रवारी
धार्मिक कार्यक्रम

हडी येथे शुक्रवारी धार्मिक कार्यक्रम

हडी येथे शुक्रवारी
धार्मिक कार्यक्रम
मालवण : कालमेतर, मेतर, मेथर, लोणे, लोंढे, हडीकर, शेलटकर परिवाराच्या हडी गावातील गाबीतवाडा येथे मूळपुरुष स्थानाचा वार्षिक उत्सव शुक्रवारी (ता. ३) साजरा होणार आहे. कालमेतर, मेतर, मेथर, लोणे, लोंढे, हडीकर, शेलटकर परिवाराच्या हडी गावातील गाबीत वाडा येथे मूळपुरुष स्थानावर गतवर्षी छोटेखानी मंदिराची उभारणी करून मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्यास बुधवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने मूळपुरुष स्थानाच्या मंदिराचा वार्षिक उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी श्रींची महापूजा, महाप्रसाद व इतर कार्यक्रम होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा तसेच इतर ठिकाणी विखुरलेल्या कालमेतर, मेतर, मेथर, लोणे, लोंढे, हडीकर, शेलटकर परिवारातील सर्व बंधू-भगिनींनी हडी येथे वार्षिक उत्सवास उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी देविदास कालमेथर (मालवण), भिकाजी लोणे (नालासोपारा) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
...............
संप्रोक्षण सोहळ्यास
आसोली येथे प्रारंभ
वेंगुर्ले ः आसोली-वडखोल येथील श्री देव गावडेश्वर व परिवार देवतेचा अर्चाशुद्धी संप्रोक्षण विधी सोहळा श्री देव गावडेश्वर मंदिर येथे सुरू झाला असून, हा सोहळा बुधवारपर्यंत (ता. १) चालणार आहे. यानिमित्त उद्या (ता. ३०) सकाळी ८ वाजता स्थापित देवता पूजन, मुख्यदेवता महापूजा, तत्व होम, शिखर कलश पूजन, कलशारोहण, श्रींची महापूजा, बलिदान, पूर्णाहूती, आरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, रात्री ८ वाजता दशावतार नाट्यप्रयोग, बुधवारी (ता. १) दुपारी आरती, तीर्थप्रसाद, महानैवेद्य, सायंकाळी ४ वाजता गणेश मूर्तीचे विसर्जन होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव गावडेश्वर देवस्थान कमिटी वडखोल-आसोली, वडखोल ग्रामविकास मंडळ, मुंबई व वडखोल ग्रामस्थांनी केले आहे.
--
कलमठ लिंगेश्वराचा
उद्या वर्धापन दिन
कणकवली ः कलमठ-गावडेवाडी येथील देव लिंगेश्वर मंदिराच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी (ता. १) विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी ६ वाजता काकड आरती, ९.३० वाजता श्रींची महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, ७ वाजता कोटेश्वर भजन मंडळ, हरकुळ बुद्रुकचे बुवा सुजित परब यांचे भजन, रात्री ९ वाजता ओम साईलिला भजन मंडळ, भांडुपचे (मुंबई) बुवा चंद्रकांत जाधव व विठ्ठल-रखुमाई भजन मंडळ, आजीवली-सोनारवाडी (राजापूर) चे बुवा प्रवीण सुतार यांच्यात डबलबारीचा सामना होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन देव लिंगेश्वर मित्रमंडळाने केले आहे.
.............
कणकवलीत ८ मे रोजी
चौंडेश्वरी वर्धापन दिन
कणकवली ः शहरातील चौंडेश्वरी मंदिराचा २१ वा वर्धापन दिन ८ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा कोष्टी समाज सेवा संघ, कणकवलीतर्फे मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. सकाळी ८ वाजता कलश दिंडी, ९ वाजता नवचंडी होमहवन, पूजाविधी, दुपारी १२.३० वाजता आरती, १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४.३० वाजता दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्र, कणकवलीतर्फे दुर्गा सप्तश्रृंगी पाठ होईल. कार्यक्रमांचा समाज बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कोष्टी समाज सेवा संघातर्फे करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com