चिपळूण ः अनंत गीते स्वतःच्या सावलीला भीत आले

चिपळूण ः अनंत गीते स्वतःच्या सावलीला भीत आले

rat29p17.jpg
80520
चिपळूणः महायुतीच्या पालवण येथील जाहीर प्रचारसभेत बोलताना खासदार सुनील तटकरे.

अनंत गीते स्वतःच्या सावलीला भीत आले
सुनील तटकरे; अवजड उद्योग २ वेळा, रोजगारशून्य
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २९ः आठवेळा भाजपसोबत निवडणुका लढलेले अनंत गीते आज त्याच भाजपवर आरोप करत आहेत. एवढा कृतघ्न माणूस कुठे पाहिला नाही. अनंत गीते स्वतःच्या सावलीला भीत आले म्हणूनच त्यांनी इतक्या वर्षात समाजातील एकाही नेतृत्वाला उभे केले नाही, अशी खरमरीत टीका सुनील तटकरे यांनी केली.
महायुतीच्या पालवण येथील प्रचारसभेत तटकरे म्हणाले, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे काही काळ अवजड उद्योगखाते असताना त्यांनी रेल्वेबोगीचा कारखाना लातूरमध्ये नेला. खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याकडे काही महिने खाते असताना गोंदियामध्ये मोठा कारखाना नेला आणि हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला; मात्र अनंत गीतेंकडे दोनवेळा हेच खाते असताना कोकणात किंवा या मतदार संघात एखादा कारखाना उभा केला नाही किंवा रोजगार उपलब्ध केला नाही.
शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पूर्ण करत असताना त्यांचा मुलगा मात्र काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसतोय हे दुर्दैव आहे, असा थेट हल्ला माजी मंत्री रामदास कदम यांनी केला.
अनंत गीते हे शेवटचे अस्त्र समाजाचे काढतात आणि मग जे मुंबईत जातात ते पुन्हा मतदार संघात फिरकतच नाहीत असा त्यांचा इतिहास आहे, असा टोला पालकमंत्री उदय सामंत यांनी लगावला. कुणबी समाजाला सुनील तटकरे यांच्यामुळे वसतीगृह मिळाले आहे उलट हे वसतीगृह होऊ नये म्हणून कुणबी समाजोन्नती संघाचे खाते गोठवण्याचे काम केले, असा थेट आरोपही उदय सामंत यांनी केला.

चौकट
उद्घाटनाला गीते गैरहजर
अजित पवार यांनी पाच कोटी रुपये देऊन पाया रचला आणि एकनाथ शिंदे यांनी ७ कोटी देऊन कळस ठेवला. त्यामुळे समाजोन्नती संघाची वास्तू मुलुंडसारख्या ठिकाणी उभी राहिली. याचा आनंद व्यक्त न करता अतिशय दु:ख झाल्याने त्या वास्तूच्या उद्घाटनालाही अनंत गीते आले नाहीत, ही शोकांतिका आहे असे तटकरे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com