निसर्गाला अनुसरून चांगले उद्योग आणा

निसर्गाला अनुसरून चांगले उद्योग आणा

१९ ( पान ५ साठी )

निसर्गाला अनुसरून चांगले उद्योग आणा

फडणवीसांना संघटनेचे साकडे ;रिफायनरी, पेट्रोकेमिकल प्रकल्पांना विरोध

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २९ ः रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्प प्रस्तावित न करता कोकणाच्या निसर्गाला अनुसरून चांगले उद्योग आणावेत, अशी विनंती रिफायनरीविरोधी संघटनेच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. प्रचारसभेनिमित्ताने राजापूर दौऱ्‍यावर आले असता बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरीविरोधी संघटनेच्या पदाधिकाऱ्‍यांनी भेट घेतली.
लोकसभा निवडणुकीतील प्रचारसभेनिमित्ताने उपमुख्यमंत्री फडणवीस नुकतेच राजापूर दौऱ्‍यावर आले होते. या वेळी बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरीविरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे, उपाध्यक्ष कमलाकर गुरव, ज्येष्ठ कार्यकर्ते सूर्यकांत सोडये, सत्यजीत चव्हाण यांनी त्यांची भेट घेतली. या वेळी कोकणामध्ये रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्प प्रस्तावित करू नयेत त्या ऐवजी कोकणाच्या निसर्गाला अनुसरून चांगले उद्योग आणावेत, त्याचे स्वागतच करू असे सांगण्यात आले तसेच बारसू, पन्हळे, गोवळ येथील दोनशेहून अधिक कातळशिल्पाचे गूगल नकाशावरचे स्थान मॅपवर दाखवून कातळशिल्प रक्षण व संवर्धन याकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले. नाटे, आंबोळगड किनारा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्याने तोही संरक्षित करण्याची गरजही या वेळी व्यक्त करण्यात आली. या वेळी फडणवीस यांनी त्या ठिकाणी उपस्थित असलेले सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांना संघटनेसोबत निवडणुकीनंतर बैठक आयोजित करण्याबद्दल सांगितल्याची माहिती संघटनेतर्फे देण्यात आली.
------
गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी

प्रकल्प येण्याच्या आधी गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदी-विक्री व्यवहारातील गैरप्रकारांची चौकशी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. तसेच, सर्व विषय सविस्तरपणे समजविण्यासाठी विस्तृत भेट देण्याची मागणी संघटनेतर्फे फडणवीस यांच्याकडे करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com