रिफायनरी आणून कोकणचा विनाश करायचाय

रिफायनरी आणून कोकणचा विनाश करायचाय

३६ ( पान ५ साठी )

कोकणच्या विकासाचे नव्हे विनाशाचे पाठीराखे

आमदार वैभव नाईक ः पंतप्रधान मोदी, राणेंवर टीका

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ ः कोकणच्या निसर्गरम्य परिसरात भाजपला रिफायनरीसारखे प्रदूषणकारी प्रकल्प आणून इथल्या पर्यावरणाचा विनाश करायचा आहे. मोदी व राणे हे कोकणच्या विकासाचे नव्हे तर इथल्या पर्यावरणाच्या विनाशाचे कॉम्बिनेशन आहे. कोकणचा केमीकल झोन करायचीच भाजप नेत्यांची इच्छा होती. त्यासाठीच त्यांनी रिफायनरीसारखा विनाशकारी प्रकल्प राजापूर तालुक्यात आणला. राणेंनी सुरुवातीला रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला आहे, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ रत्नागिरी झालेल्या सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, भाजपने महत्वाकांक्षी प्रकल्प रेटण्यासाठी नारायण राणेंना राज्यसभेतून खासदारकी बहाल केली होती. भाजपकडून खासदारकी मिळताच नारायण राणेंना एकाएकी रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणचा विकास होईल असा साक्षात्कार झाला आणि त्यांनी पुर्णपणे यु-टर्न घेऊन स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असताना विनाशकारी रिफायनरी प्रकल्प कोकणात रेटण्यासाठी ते सज्ज झाले. रिफायनरी प्रकल्पाला लोकांचा विरोध कमी होत नसल्यामुळे भाजपने नारायण राणेंना केंद्रात मंत्रीपद दिले. त्यांनी आपल्या परीने हा प्रकल्प रेटायचा पुरेपुर प्रयत्न केला. प्रकल्पस्थळी झालेल्या मातीपरीक्षणाला स्थानिकांनी विरोध केला. त्याठिकाणी ग्रामस्थांवर लाठीचार्ज झाला. त्यात अनेक ग्रामस्थांना दुखापतही झाली. तरीही ते गोरगरीब ग्रामस्थ आंदोलनावर ठाम राहिले. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पविरोधी आंदोलनात अशाच प्रकारे विरोध झाला होता. खासदारकीच्या आणि केंद्रीय मंत्रीपदाच्या स्वार्थासाठी विनाशकारी प्रकल्प रेटू पाहणाऱ्यांना आणि विनाशकारी प्रकल्प रेटण्यासाठी भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठांनी राणेंना लोकसभेची उमेदवारी दिली. -------

नेमके काय दिवे लावले
गेली तीन वर्षे नारायण राणे केंद्रीय लघू, सुक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री या पदावर कार्यरत होते. आपल्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात नारायण राणेंनी कोकणातील जनतेसाठी नेमके काय दिवे लावले, सर्वप्रथम त्याची माहिती कोकणातील जनतेला द्यावी,असे नाईक यांनी सांगितले.
----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com