समर सायक्लोथॉनमध्ये २०० स्पर्धक सहभागी

समर सायक्लोथॉनमध्ये २०० स्पर्धक सहभागी

२४ (टूडे पान ३ साठी, सेकंड मेन)

- rat३०p१७.jpg -
P२४M८०६८४
दापोली : दापोली समर सायक्लोथॉन २०२४ मध्ये सहभागी झालेले सायकलस्वार.

दापोली समर सायक्लोथॉन उत्साहात

६० किमी मार्गाची स्पर्धा ; सायकलस्वारांनी निसर्गसौंदर्याचा अनुभवत लुटला

सकाळ वृत्तेसवा
दाभोळ, ता. ३० : दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित दापोली समर सायक्लोथॉन २०२४ सीझन पाचमधील सायकल स्पर्धेला महाराष्ट्रासह विविध राज्यातील ८ ते ७१ वयोगटातील २०० स्पर्धक सहभागी झाले होते. दापोली-आसूद-हर्णै-मुर्डी-आंजर्ले-आडे-उटंबर पुन्हा दापोली या समुद्रकिनाऱ्यावरील ६० किलोमिटर मार्गावर कोकणातील निसर्गसौंदर्य अनुभवत सायकल चालवण्याचा आनंद लुटला.
ही स्पर्धा ३० व ६० किमी कोस्टल सिनिक रूट, शॉर्ट सिटी लूप, फॅन राईड अशा गटात झाली. ६० किमी अंतर ३ तासाच्या आत पूर्ण केले. सर्व स्पर्धकांना पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. त्यामध्ये ७१ वर्षीय गटात प्रवीणकुमार कुलथे (ठाणे), ६० प्लस वयोगटात सतीश जाधव (परेल), डॉ. चिमा (चेंबूर), सुनील गाडगीळ (जोगेश्वरी), अनंत सहस्त्रबुद्धे (छत्रपती संभाजीनगर), धनंजय तेलगोटे (ठाणे), विनायक वैद्य (खेड), सीताराम रोकडे, बाला रोकडे, सुवर्णा अडसुळे (ठाणे), महेश दाभोलकर (ऐरोली) इत्यादींना सन्मानचिन्ह देण्यात आले तसेच ६० किमी पूर्ण करणारे लहान सायकलस्वारांमध्ये १४ वर्षीय वरद कदम, स्वराज मांजरे, साईप्रसाद वराडकर, आयुष जोशी, वेदांग करंदीकर यांचा समावेश आहे. ३० किमी अंतर पूर्ण करणाऱ्या लहान सायकलस्वारांमध्ये १३ वर्षीय अवधूत पाते, रूद्र बडंबे यांनी चमक दाखविली. शॉर्ट सिटी लूप गटात ८ वर्षीय आदिनाथ शिगवण आणि अनन्या गोलांबडे हे लहान सायकलस्वार ठरले.
या सायक्लोथॉनच्या निमित्ताने दापोलीचे सौंदर्य कुटुंबासह पाहता आल्यामुळे बाहेरगावाहून आलेले सर्व रायडर खुश होते. अनेकांनी २ ते ६ दिवस मुक्काम करून स्थानिक वस्तूंची खरेदी केली. सायक्लोथॉनसाठी प्रमुख अतिथी नगराध्यक्षा ममता मोरे, दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या डॉ. जतकर व टीम, दापोली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मारकड व टीम, दापोली पोलिस, राहुल मंडलिक इत्यादी अनेक मान्यवर स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते. या सायक्लोथॉन स्पर्धेचे नियोजन करण्यात अंबरिश गुरव, प्रशांत पालवणकर, अजय मोरे, राजेशकुमार कदम, रागिणी रिसबूड इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली.

-----

यांचाही झाला सन्मान

या सायक्लोथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी एका दिवसात २३० किमी अंतर सायकल चालवत कल्याण ठाणेहून आलेले राज वाघ, चिन्मय फोंडबा, पंकज फाले यांनाही गौरवण्यात आले तसेच सिंगापूर ते लंडन सायकल प्रवास करत दापोलीत पोहोचलेले टॉम व जुलिया यांनीही स्पर्धकांसोबत सायकल चालवत त्यांचे अनुभव कथन केले.
-------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com